संजय दत्तचं हे गाणं ऐकण्यासाठी सकाळी उठायचे लोक, 34 वर्षांपासून प्रचंड क्रेझ, ऐकताच मनाला मिळतो सुकून
संजय दत्तचं 34 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकण्यासाठी सकाळी-सकाळी लोक टीव्ही चालू करायचे. इतकं सुंदर की प्रेक्षकांमध्ये आजही त्याची क्रेझ प्रचंड. ऐकताच दिवसभर गुणगुणतात लोक.

हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक उदित नारायण यांनी आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 90 च्या दशकात त्यांनी अनेक रोमँटिक आणि एनर्जेटिक गाणी गायली, जी आजही संगीतप्रेमी आवडीने ऐकतात. हिंदीसोबतच त्यांनी नेपाळी, भोजपुरी, मैथिली आणि दक्षिण भारतीय भाषांमध्येही आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे.
‘कयामत से कयामत तक’मधील ‘पापा कहते हैं’, ‘जो जीता वही सिकंदर’मधील ‘पहला नशा’ आणि ‘राजा हिंदुस्तानी’मधील ‘कितना प्यारा तुझे रब ने बनाया’ ही त्यांची काही गाजलेली गाणी आहेत.
या गाण्याचा अर्थ काय?
याच लोकप्रिय गाण्यांच्या यादीतील एक गाणं म्हणजे 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यलगार’ चित्रपटातील ‘आखिर तुम्हें आना है’. या गाण्याला उदित नारायण आणि सपना मुखर्जी यांनी आपला आवाज दिला होता. संजय दत्त आणि नगमा यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवरील रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली होती.
या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार सुदर्शन फाकिर यांनी लिहिले होते तर चन्नी सिंह यांनी त्याला सुंदर संगीत दिले होते. ‘आखिर तुम्हें आना है’ या ओळींमधून प्रेमातील विश्वास आणि आपल्या जोडीदाराच्या परतण्याची खात्री व्यक्त होते. कितीही अंतर निर्माण झालं किंवा परिस्थिती प्रतिकूल झाली तरी प्रिय व्यक्ती आपल्याकडे नक्की परत येईल असा या गाण्याचा भाव आहे.
चित्रपटाची कथा काय?
‘यलगार’ चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान यांनी केलं होतं. चित्रपटाची कथा बालपणीच्या दोन मित्रांमधील संघर्ष आणि वैराभोवती फिरते. एका बाजूला प्रामाणिक पोलीस कमिशनर कुमार, तर दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी विश्वातील डॉन राजेश्वर अशी या कथानकाची मांडणी आहे.
चित्रपटात संजय दत्त, नगमा यांच्यासोबत मनीषा कोईराला आणि फिरोज खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटातील ‘आखिर तुम्हें आना है’ या गाण्याने 90 च्या दशकातील संगीतप्रेमींच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं. आजही या गाण्याची रोमँटिक धून आणि उदित नारायण यांचा सुरेल आवाज रसिकांना जुन्या आठवणींमध्ये घेऊन जातो.
