
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज अलास्कात भेटणार आहेत. सहा वर्षांनंतर होणारी ही भेट एंकोरेजच्या एलमेनडॉर्फ-रिचर्डसन मिलिट्री बेसवर होणार आहे. हे दोन नेते चार तास मिटींग घेतील. या दरम्यान या एकाच खोलीत ७००० अणूबॉम्बचा कंट्रोल असणार आहे. नागासाकी एटोमिक रिसर्च संस्थेच्या मते रशियाकडे ४,३१० न्युक्लिअर वॉरहेड आहेत तर अमेरिकेकडे जवळपास ३,९०० अणूबॉम्ब आहेत.
फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया-युक्रेन यांच्या युद्धाला सुरुवात झाल्यानंतर पुतीन यांना अभावानेच कोणत्या देशात पाहायला मिळाले. अलास्कात पुतीन यांना अनेक पदरी सुरक्षा असेल. पुतीन यांच्या सुरक्षेत रशियाची फेडरल प्रोटेक्टीव्ह सर्व्हीस (FSO)ची स्पेशल युनिट तैनात असेल. पुतीन यांचे अंगरक्षकांकडे अनेक सुटकेस असतील. परंतू हे सामान्य सुटकेस नाहीत. सर्व सुटकेस बुलेटप्रुफ प्रोटेक्शनसह असले. ज्यास पुतीन यांच्यावर फायरिंग झाली तर ढालीसारखा त्याचा वापर होईल.
Russia’s Neuclear Suitcase – रशियाच्या आण्विक बॉम्बचे कळ असलेली ब्रिफकेस चेगेटसह नेव्हीचा अधिकारी
पुतीन यांच्या सोबत रशियाचा आण्विक बॉम्बची कळ असलेला ब्रिफकेस चेगेट देखील असेल. याचे नाव काकेशस पर्वतातील स्थित माऊंट चेगेट वरुन ठेवले आहे. ही ब्रिफकेस प्रत्येक वेळी पुतीन यांच्यासोबत असेल. परंतू यास क्विचित चित्रित केले गेले आहे. सर्वसामान्यपणे रशियन नेव्हीचा अधिकारी ही ब्रिफकेस घेऊन चालत असतो. हा एक कम्युनिकेशन डीव्हाईस आहे. ज्यातून केव्हाही न्युक्लिअर अटॅक लाँच करण्याचा आदेश दिला जाऊ शकतो. या सुटकेसला रिमोट ब्लास्टपासून वाचवण्यासाठी जामर लावलेला असतो.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प CIA हेडक्वार्टरमधून बाहेर पडताना त्यांच्या मागे ब्लॅक ब्रिफकेस घेऊन चालणारा एक सैनिक, छायाचित्र जानेवारी 2017 चे आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सोबतही एक ब्रिफकेस असते, तिला ‘न्युक्लिअर फुटबॉल’ नावाने ओळखले जाते. या सर्वसाधारणपणे प्रेसिडेंशियल इमर्जन्सी सॅचेल म्हटले जाते. याच्या द्वारे राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाऊस सिच्युएशन रुम वा प्रेसिडेंशियल इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरला आण्विक हल्ल्यासाठी कमांड देऊ शकतात. न्युक्लिअर फुटबॉल एक बिस्कीटासारखे दिसणारे कार्ड असते. ज्यावर न्युक्लिअर लाँच कोड्स लिहिलेला असतो.
पुतीन आणि ट्रम्प यांच्या भेटी दरम्यान रशिया आणि अमेरिकेचे स्पेशल एजन्ट्सचा मजबूत सुरक्षा घेरा असणार आहे. एंकोरेज येथे असलेल्या बेस अमेरिकेचा वायुसेना, थलसेना,नौसेना आणि मरिन कोरच्या सैनिकांसह नॅशनल गार्ड्समॅनने भरलेला असतो.