
अमेरिका आणि इराणमध्ये मोठे युद्ध पेटले. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करत आहे. इराणच्या प्रमुख शहरांमध्ये मोठी हल्ले करण्यात आली असून इमारतींचे नुकसान झाले. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई हल्ल्यात ठार झाले. आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार मारण्यात आल्याने इराणच्या लोकांमध्ये मोठा संताप आहे. लोक रस्तावर उतरली आहेत. आयातुल्ला अली खामेनेई यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील जवळपास सदस्य अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यात मारली गेली. आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार केल्यानंतर देशात संताप आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून तीव्र हल्ले केली जात आहेत. हेच नाही तर या हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून इराणने 8 देशांच्या लष्करी बेसवर हल्ला चढवला. अमेरिकेने मोठी धमकी देत थेट म्हटले आहे की, आजच अमेरिका इराणवर अत्यंत मोठा हल्ला करणार आहे. इराणी मिडियाकडून आयातुल्ला अली खामेनेई यांचा एक व्हिडीओ व्हायरल केला जात आहे, बदला घेतला जाणार असल्याचे त्यामध्ये म्हणण्यात आले.
आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणचे सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनी यांची निवड करण्यात आली. इराणने मोठा इशारा अमेरिकेला दिला आहे. गेल्या काही तासांपासून इराणकडून दुबईवर मोठी हल्ले केली जात आहेत. दुबईच्या विमानतळालाही टार्गेट करण्यात आले. मात्र, आता इराणने दुबईवर हल्ले करण्यामागचे खरे कारण पुढे आले. अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला.
‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचा निर्णय एका रात्रीत घेतला नाही तर त्यामागे सौदी अरेबिया आणि इस्रायलचा हात आहे. इराणवर हल्ला करण्याकरिता साैदी अरेबिया आणि इस्त्रायल अमेरिकेच्या मागे लागले होते. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला की, साैदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी गेल्या महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांना अनेक फोन केले.
हे खासगी फोन कॉल इराणवर कारवाई करण्यात यावी, याकरिता होते आणि सतत दबाव टाकला जात होता. यामुळेच आता साैदी अरेबियावरही इराणकडून हल्ला केला जात आहे. एकीकडे अमेरिका इराणसोबत चर्चा करत होती तर दुसरीकडे अचानक हल्ला करण्यात आला. एकमेकांवरील हल्ले तात्काळ थांबवला असे चीनकडून आव्हान करण्यात आले.