AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Red Flag on Jamkaran Mosque: पवित्र जामकरन मशिदीवर लाल ध्वज…कुणाच्या नावाचं डेथ वॉरंट?

Israel Iran Conflict and Red Flag on Jamkaran Mosque: अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी हे कुटुंबासह ठार झाले. संतापलेल्या इराणने आता त्याचा बदला घेण्यासाठी मोठे पाऊल टाकले आहे. ट्रम्प यांच्याविरोधात फतवा जारी करण्यात आला आहे.

Red Flag on Jamkaran Mosque: पवित्र जामकरन मशिदीवर लाल ध्वज...कुणाच्या नावाचं डेथ वॉरंट?
इराणकडून ट्रम्पविरोधात फतवाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 01, 2026 | 2:29 PM
Share

Iran issues fatwa against Donald Trump: अमेरिका आणि इस्त्रायलने सकाळपासून इराणवर जोरदार हल्ला चढवला. त्यात इराणचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी हे कुटुंबासह या हल्ल्यात ठार झाले आहेत. संतापलेल्या इराणने याचा बदल घेण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात फतवा जारी करण्यात आला आहे. त्यासाठी इराणची पवित्र जामकरन मशि‍दीवर लाल ध्वज फडकवण्यात आला आहे. आता इराणचे नागरिक, शिया मुस्लिम हे कोणत्याही मार्गाने हा बदला घेऊ शकतात याचे हे प्रतिक आहे. पण इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात फतवा का जारी करण्यात आला नाही याविषयी चर्चा होत आहे.

ट्रम्प विरोधात फतवा

इराणवरील हल्ल्यात सर्वोच्च धर्मगुरू आणि नेते अयातुल्ला खोमेनी हे ठार झाले. त्यांची मुलगी, नातवंडं, जावई, इतर साथीदार या हल्ल्यात ठार झाले. हा इराणसह जगभरातील शिया समाजासाठी मोठा हादरा मानल्या जातो.तेहरानसह विविध शहरात अमेरिका आणि इस्त्रायलविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहे. अनेक ठिकाणी मातम सभा, शोक सभा आणि निषेध मोर्चे काढण्यात येत आहेत. त्यात लाखोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत. खोमेनी समर्थक संतप्त झाले आहेत. तर आता या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराणकडून फतवा जारी करण्यात आला आहे.

जामकरन मशीद (Masjid-e-Jamkaran)

जामकरन मशीद ही इराणमधील कोम (Qom) शहरापासून जवळपास 6 किलोमीटर पूर्वेला आहे. ही मशीद जामकरन या गावात आहे. कोम-कशान या मार्गावर हे गाव आहे. हे स्थान शिया इस्लामचे सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. बारावे इमाम, इमाम महदी (AS) यांच्याशी संबंधित हे पवित्र ठिकाण आहे. शिया परंपरेनुसार ही मशीद 393 हिजरी (1003 ईस्वी) मध्ये हसन बिन मस्लह (Hassan bin Maslah) यांनी इमाम महदी यांच्या आदेशानंतर बांधली होती. महदी हे शांतीदूत मानले जातात. हसन बिन मुथलिह जामकरानी (Sheikh Hassan ibn Muthlih Jamkarani) यांना एकदा स्वप्नात ही मशीद बांधण्याचे आदेश मिळाले होते, अशी मान्यता आहे.

लाल ध्वज फडकावला, अर्थ काय?

जामकरन मशि‍दीवर लाल ध्वज फडकवणे हा शत्रूला थेट संदेश मानल्या जातो. तर शिया परंपरेत बदला घेण्यासाठी लाल ध्वज (Red Flag) फडकवला जातो. त्यामुळे इराणची ही पवित्र मशीद या ध्वजासाठी खास ओळखली जाते. अर्थात हा ध्वज पहिल्यांदाच फडकवण्यात आला असे नाही. यापूर्वी सुद्धा प्रमुख नेत्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा लाल रंगाचा ध्वज फडकवण्यात आला आहे. जानेवारी 2020 मध्ये इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर कासिम सलेमानी यांची हत्या, एप्रिल 2024 इस्त्रायलविरोधात ड्रोन हल्ला तर 31 जुलै 2024 रोजी हमास नेता इस्माइल हानियेहच्या हत्येनंतर मशि‍दीवर लाल ध्वज फडकवण्यात आला होता.

Follow Us
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत.
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,.
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो.
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय.
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक....
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक.....