AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mirza Iran: तिकडं देश संकटात, सर्वोच्च नेता ठार… इकडं इराणच्या पहेलवानाची सांगलीच्या मातीत जोरदार झुंज…पुढं झालं काय?

Iran Ayatollah Khamenei: इराणवर अमेरिका आणि इस्त्रायलने भीषण हल्ला चढवला. त्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी आणि त्यांच्या कुटुंबियांचा खात्मा झाला. देशवर संकटाचे ढग अधिक गडद झाले असताना इकडं सांगलीत इराणच्या पहेलवानाची मोठी चर्चा आहे. सांगलीतील कुस्ती स्पर्धेत मिर्झा इराणने कडवी झुंज दिली.

Mirza Iran: तिकडं देश संकटात, सर्वोच्च नेता ठार... इकडं इराणच्या पहेलवानाची सांगलीच्या मातीत जोरदार झुंज...पुढं झालं काय?
मिर्झा इराण विजयीImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 01, 2026 | 1:30 PM
Share

Iranian wrestler Mirza Iran wins: अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे न भरून निघणारे मोठे नुकसान झाले. त्यांचे सर्वोच्च धर्मगुरू आणि नेते अयातुल्ला खोमेनी हे कुटुंबासह ठार झाले. या हल्ल्यात त्यांची मुलगी, जावाई, नातवंडांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेशी अणु करारावरील बोलणी फिसकटल्यानंतर एकाएक काल इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला चढवला होता. त्याला थोड्याचवेळात इराणकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. त्यापूर्वीच खोमेनी यांच्या निवासस्थान आणि राष्ट्रपती भवनावर भीषण हल्ला करण्यात आला होता. संध्याकाळी झालेल्या धुमश्चक्रीत अयातुल्ला यांच्यासह त्यांचे कुटुंबिय आणि साथीदार ठार झाल्याचे समोर आले होते. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवर या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. सध्या इराण संकटात सापडला आहे. जनतेने त्यांचा सर्वोच्च नेता गमावला आहे. तर इकडं सांगलीत इराणच्या पहेलवानाने मोठी कामगिरी बजावली आहे. सांगलीच्या मातीत इराणचा पहेलवान मिर्झा इराण याने कडवी झुंज दिली आहे.

मिर्झा इराणने पटकवला छत्रपती केसरी किताब

सांगलीमध्ये रंगलेल्या भारत विरुद्ध इराण कुस्ती स्पर्धेत इराणच्या मल्लाने बाजी मारत छत्रपती केसरी किताब पटकावला आहे.सांगलीतल्या कुस्तीप्रेमी ग्रुप तर्फे भव्य कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आलं होतं. ज्यामध्ये भारत केसरी शेरा गुज्जर विरुद्ध मिर्झा इराण यांच्यात प्रमुख कुस्ती पार पडली. सुमारे अर्धा तास रंगलेल्या कुस्तीमध्ये मिर्झा इराण याने शेरा गुजर याच्यावर मात केली.

त्याला गुणांआधारे छत्रपती केसरी किताब देण्यात आला. डबल महाराष्ट्र केसरीच्या चंद्रहार पाटील यांच्या हस्ते मिर्झा इराण याला किताब देण्यात आला. तर महिला गटात प्रतीक्षा बागडी विरुद्ध सोनाली मंडलिक यांच्यात लढत झाली,मात्र कुस्ती बरोबरीत सुटल्याने टॉस सोनालीला विजय मिळवत राजमाता जिजाऊ केसरी किताब पटकावला. सांगलीच्या कृष्णा नदीवरील सरकारी घाटावर कुस्त्यांचा आयोजन करण्यात आलं होतं. या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठे गर्दी केली होती.

दरम्यान देश संकटात असताना मिर्झा इराण याने भारतात यश संपादन केलं. त्याची एकच चर्चा सांगलीत रंगली आहे. सर्वांनी त्याच्या धैर्याचं आणि डावपेचाचं कौतुक केलं. त्यानं अत्यंत संयमाने आणि वेळेत धडक मारत केसरी शेरा याला जेरीस आणले. अर्धा तास दोघांची झुंज सुरू होती. दोघांची ही कुस्ती पाहण्यासाठी पंचक्रोशीतून मोठी गर्दी झाली होती.

मायदेशी परतण्याची वाट खडतर

कालपासून युद्धाच्या वार्ता सर्वत्र सुरू झाल्या आहेत. ही गोष्ट इराणच्या पहेलवानाच्याही कानावर पोहचली. पण त्याने त्याच्या खेळावरील लक्ष विचलित होऊ दिले नाही. त्याने हा सामना त्याच्या बाजूने वळवला आणि यश संपादन केले. पण हे यश मिळवून ही देशातील परिस्थितीने त्याचे मन गलबलून गेले. देशावर मोठे संकट आल्याचे त्याच्या चेहऱ्याचे भाव सांगत होते.

तर सध्या मिर्झा इराणला, आपल्या देशात परतण्याचा मार्गही बंद झाला आहे. सध्याचे युद्धाचे ढग गडद झाल्याने त्याला मायदेशी परत जाता येणार नाही. हवाई हल्ले सुरु असल्याने त्याला मायदेशात परतता येणार नाही. इराणमध्ये सध्या मोठा असंतोष दिसून येत आहे. इराणला जाण्याचा मार्ग खडतर असल्याने त्याला काही दिवस भारतातच घालवावे लागतील हे उघड आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...