निसर्गाचा चमत्कार ! सौदी अरेबियातील वाळवंटात बर्फवृष्टी, पाहा VIDEO

निसर्गात कधी कोणती गोष्ट पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. काही लोकं याला चमत्कार म्हणताय तर पर्यावरण तज्ञ याला कहर म्हणताय. पण पहिल्यांदाच असं घडलं की, एखाद्या वाळवंटात बर्फवृष्टी झाली आहे. सौदी अरेबियातील या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ आता चर्चेचा विषय बनली आहेत.

निसर्गाचा चमत्कार ! सौदी अरेबियातील वाळवंटात बर्फवृष्टी, पाहा VIDEO
| Updated on: Nov 07, 2024 | 9:28 PM

उष्ण वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या वाळवंटात अचानक मुसळधार पाऊस, गारपीट, कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टी होऊ लागली तर तुम्हाला ही आश्चर्य वाटले ना. पण हे खरं आहे. कारण सौदी अरेबियातील एका वाळवंटात असा प्रकार घडलाय. इथे एवढी बर्फवृष्टी झाली की लाल वाळूवर  पर्यटकांना पांढऱ्या चादरसारखी बर्फवृष्टी झाली आहे. सौदी मीडियानुसार, सौदी अरेबियातील अल-जॉफच्या वाळवंटी भागात बर्फवृष्टीमुळे कडाक्याची थंडी जाणवत आहे. सौदी अरेबियात पहिल्यांदाच असं घडलं. ज्याला काही लोकं निसर्गाचा चमत्कार म्हणत आहेत. पण काही लोकं आणि पर्यावरण तज्ञ या घटनेला निसर्गाचा कहर म्हणत आहेत.

सौदी अरेबियातील हवामानाचा पॅटर्न गेल्या एका आठवड्यापासून खूपच बिघडला आहे. इथल्या हवामानापेक्षा खूपच वेगळं हवामान इथे तयार झाले आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी अल-जौफमध्ये मुसळधार पाऊस झाला. जोरदार गारपीट झाली. यानंतर येथील काही भागात पूर आला होता.

आठवडाभरानंतर आता भागात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. संपूर्ण परिसरावर पांढरी चादर पसरली आहे. सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर लोक इथून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत.


संयुक्त अरब अमिरातीच्या हवामान केंद्राच्या (एनसीएम) मते, याचे कारण अरबी समुद्रापासून ओमानपर्यंत पसरलेली कमी दाबाचा पट्टा आहे. कमी दाबामुळे आर्द्रतेने भरलेले वारे सामान्यतः कोरडे असलेल्या भागात आले आहे. यामुळेच सौदी अरेबिया आणि शेजारी राष्ट्र संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये ढगांचा गडगडाट, मुसळधार पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी होत आहे. यूएईच्या हवामान विभागाने येत्या काही दिवसांत अल-जौफमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.