Joe Biden: जो बायडन यांच्या सुरक्षेत मोठी चूक? घरावरुन खासगी विमान झेपावल्यानं बायडन यांना सुरक्षित स्थळी हलवलं

| Updated on: Jun 05, 2022 | 6:37 AM

चुकून हे विमान संरक्षित हवाई हद्दीत घुसल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी आता चौकशी करुन कारवाई देखील केली जाणार आहे.

Joe Biden: जो बायडन यांच्या सुरक्षेत मोठी चूक? घरावरुन खासगी विमान झेपावल्यानं बायडन यांना सुरक्षित स्थळी हलवलं
जो बायडन यांच्या समुद्रकिनाऱ्या जवळील बीच हाऊसवरुन खासगी विमान झेपावलं
Image Credit source: twitter
Follow us on

नवी मुंबई : अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर येतं आहे. अमेरिकेत शनिवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden’s) यांच्या समुद्रकिनाऱ्या जवळील बीच हाऊसवरुन एक लहान खासगी विमान (private airplane) झेपावलं होतं. ही बाब निदर्शनास येता सुरक्षेच्या कारणास्तव जो बायडन यांच्यासह त्यांच्या पत्नीला तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. व्हाईट हाऊसकडून (White House) याबाबतची माहिती जारी करण्यात आली आहे. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्यानं याबाबतची माहिती दिली आहे. वॉशिंग्टन पूर्वेला असलेल्या रेहोबोथ किनाऱ्यावरील डेलोवेथ इथं हा प्रकार निदर्शनास आला. एक विमान अचानकपणे जो बायडन यांच्या बीच हाऊस येथील हवाई हद्दीत घुसलं होतं. या विमानाचा प्रवेश संशयास्पद मानला जात होता. मात्र हा कोणत्याही प्रकारचा हल्ला नव्हता, असं व्हाईटहाऊस कडून स्पष्ट करण्यात आलंय. चुकून हे विमान बीच हाऊसच्या हवाई हद्दीत घुसलं होतं. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने जो बायडन आणि त्यांच्या पत्नीला सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. यानंतर त्यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली.

सगळं निवळल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट जिल बायडन हे पुन्हा बिच हाऊस येथील घरी देखील परतले. अमेरिकेच्या सिक्रेट सर्विसने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. चुकून हे विमान संरक्षित हवाई हद्दीत घुसल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी आता चौकशी करुन कारवाई देखील केली जाणार आहे.

कुणावर कारवाई?

संरक्षित केलेल्या हवाई हद्दीतमध्ये एक खासगी विमान घुसलं. यामुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. नियम मोडत संरक्षित हवाई हद्दीत घुसलेल्या या विमानाच्या पायलटची आता चौकशी केली जाणार आहे. सदर पायलट हा रेडिओ सिग्नलद्वारे वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेचं पालन करत होतं. त्यामुळे ही चूक झाली असल्याची शंकाही घेतली जातेय.

अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते एन्थोनी गुग्लिएलमी यांनी या घटनेबाबतची माहिती दिलीय.