गावाचं नाव इतकं विचित्र की गावकऱ्यांना पण सांगायला वाटते लाज, शेवटी…
असं एक गाव ज्याचे नाव सांगायला देखील गावकऱ्यांना वाटते लाज. मात्र, पर्यटक येऊन गावाच्या पाटीसोबत सेल्फी घेतात.
1 / 5

नाव ही कोणत्याही व्यक्तीची किंवा ठिकाणाची ओळख असते, मात्र कधी-कधी हेच नाव अडचणीचे ठरू शकते.
2 / 5

अशीच एक घटना ऑस्ट्रियामधील एका गावाबाबत समोर आली आहे. या गावाचे नाव घेताना देखील गावातील लोक लाजतात.
3 / 5

या गावाचे जुने नाव Fucking असे होते, ज्यामुळे ते सोशल मीडियावर सतत चर्चेत राहायचे. परदेशी पर्यटक या नावामुळे आकर्षित होऊन गावाच्या साइनबोर्डजवळ फोटो काढत आणि ते सोशल मीडियावर शेअर करत.
4 / 5

यामुळे गावकऱ्यांना अपमानास्पद वाटू लागले. या वाढत्या त्रासामुळे अखेर स्थानिक प्रशासनाने गावाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. 1 जानेवारी 2021 पासून या गावाचे नाव Fugging असे ठेवण्यात आले.
5 / 5

हे गाव अप्पर ऑस्ट्रियातील टार्सडॉर्फ परिसरात असून जर्मनीच्या सीमेच्या जवळ आहे. नावामुळे होणाऱ्या गैरसोयीमुळे गावकऱ्यांनी घेतलेला हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Follow Us