मृत्यू झाला, सहा बोटे… अखेर नेतन्याहूंबाबत मोठी अपडेट समोर, इराणला धक्का! थेट तो Video Viral

मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इजरायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते एका कॅफेमध्ये कॉफी पिताना दिसत आहेत. यानंतर सोशल मीडियावर या व्हिडिओबाबत विविध दावे केले जात आहेत.

मृत्यू झाला, सहा बोटे... अखेर नेतन्याहूंबाबत मोठी अपडेट समोर, इराणला धक्का! थेट तो Video Viral
Iran and Israel
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 17, 2026 | 1:40 PM

गेल्या तीन आठवड्यांपासून मध्य-पूर्वेतील तणाव हा वाढत चालला आहे. इराण अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांवर प्राणघातक हल्ले करताना दिसत आहे. अशातच इज्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर सुरु आहेत. अनेक इराण समर्थक सोशल मीडिया हँडल्सवर त्यांच्या मृत्यूची चर्चा करत आहेत. मात्र, याच दरम्यान नेतन्याहू यांनी एक व्हिडीओ जारी करून जिवंत असल्याचा संदेश दिला. पण हा व्हिडीओ प्रसिद्ध केल्यानंतरच त्यावर प्रश्न उपस्थित झाले आणि अफवांचा सिलसिला पुन्हा वेगने सुरु झाला. आता अखेर आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

नेतन्याहू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते कॉफी पिताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये ते एका कॅफेमध्ये उभे राहून कॉफी पिताना दिसत आहेत. कॅमेऱ्यामागे उभ्या असलेल्या व्यक्तीने त्यांना विचारले की, मीडियामध्ये त्यांच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत. यावर नेतन्याहू हसत मजेशीर अंदाजात म्हणतात की, लोक म्हणत आहेत की बीबी (नेतन्याहूंचे टोपणनाव) मेला आहे. माझ्या हाताला सहा बोटे कशी? तुम्हीही तेच विचारत आहात का? हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकीकडे त्यांच्या जिवंत असण्याची चर्चा सुरू झाली, तर दुसरीकडे सोशल मीडियावर काही युजर्सनी दावा केला की हा व्हिडीओ डीपफेक आहे. एआयने मदतीने तयार करण्यात आला आहे.

ग्रोकचे स्क्रीनशॉट व्हायरल

वाद तेव्हा आणखी तीव्र झाला जेव्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर असलेल्या एआय चॅटबॉट ग्रोकला एका युजरने या व्हिडीओ खरा आहे का विचारले. ग्रोकने आपल्या उत्तरात दावा केला की हा नेतन्याहूंचा डीपफेक व्हिडीओ असू शकतो. चॅटबॉटच्या मते, व्हिडीओमध्ये ते एका कॉफी शॉपमध्ये बसून इराण आणि लेबनॉनशी संबंधित सैन्य ऑपरेशनची चर्चा करताना दिसत आहेत, तर अशी कोणतीही सार्वजनिक कार्यक्रम किंवा घटना कुठेही नोंदवलेली नाही. ग्रोकच्या या उत्तराचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले, ज्यामुळे व्हिडिओच्या खरेपणाबाबत आणखी गोंधळ निर्माण झाला.

कॅफेने शेअर केला तो व्हिडीओ

याच दरम्यान ज्या कॅफेमध्ये नेतन्याहू कॉफी पिताना दिसत आहेत, त्यानेही सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. यरुशलमच्या डोंगराळ भागात असलेल्या The Sataf कॅफेने इंस्टाग्रामवर नेतन्याहूंचे फोटो पोस्ट केले आहेत. कॅफेने फोटो शेअर करत लिहिले की, पंतप्रधान आणि त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्यांसाठी मेजवानी बनवून आम्हाला आनंद झाला. आज सतफमध्ये पंतप्रधान आणि त्यांच्या टीमची मेजवानी करून आम्हाला खूप आनंद झाला. आता लोकांना कळले असेल की कोणत्या बेकरीमध्ये यायचे… त्यामुळे आता नेतन्याहू यांच्या निधनाच्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Follow Us