गुरुद्वारा कमिटीसोबत बैठक, तालिबानचा अफगाणिस्तानातील हिंदूंबाबत मोठा निर्णय

| Updated on: Aug 20, 2021 | 12:25 PM

अफगाणिस्तानात तालिबानराज आल्यानंतर (Taliban) तिथे अफरातफर माजली आहे. देशातील नागरिक, मुस्लिम धर्मीय सैरावैरा धावत असताना, तिथले अल्पसंख्यांक विशेषत: हिंदू  (Hindu)आणि शीख (Sikh) भीतीच्या छायेत आहेत.

गुरुद्वारा कमिटीसोबत बैठक, तालिबानचा अफगाणिस्तानातील हिंदूंबाबत मोठा निर्णय
Kabul Taliban fighters pose for a photograph in Kabul, Afghanistan
Follow us on

Afghanistan crisis काबूल : अफगाणिस्तानात तालिबानराज आल्यानंतर (Taliban) तिथे अफरातफर माजली आहे. देशातील नागरिक, मुस्लिम धर्मीय सैरावैरा धावत असताना, तिथले अल्पसंख्यांक विशेषत: हिंदू  (Hindu)आणि शीख (Sikh) भीतीच्या छायेत आहेत. भारतानेही अफगाणिस्तानात राहणाऱ्या हिंदू आणि शीख धर्मीयांना शरण देण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र आता तालिबानने  त्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख एकदम सुरक्षित असतील असं आश्वासन तालिबानने दिलं आहे. नुकतंच तालिबानने काबूल इथल्या गुरुद्वारा कमिटीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी आश्वास्त केलं. हिंदू आणि शिखांना कोणताही त्रास दिला जाणार नाही. त्यांना पूर्ण सुरक्षाही दिली जाईल, असं तालिबानने सांगितलं.

तालिबानच्या भीतीने काबूलमधील गुरुद्वारात 200 पेक्षा अधिक नागरिकांनी आश्रय घेतला होता. यामध्ये सर्वाधिक हिंदू आणि शिखांचा समावेश होता. त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तालिबानने गुरुद्वारा कमिटीसोबत बैठक घेऊन चर्चा केली. त्यांना आश्वस्त करत, कोणताही त्रास देणार नसल्याचं सांगितलं.

अल्पसंख्याकांना भीती कायम

दरम्यान, तालिबानने जरी सुरक्षेची हमी दिली असली तरी अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू, शीख धर्मीयांना भीती कायम आहे. सध्याची अफगाणिस्तानातील परिस्थिती पाहिली तरी तालिबानच्या आश्वासनांवर कोणाला विश्वास नाही. तालिबानच्या करणी आणि कथनीमध्ये फरक असल्याचं इथले स्थानिक सांगतात. कारण शरिया कायदा लागू करण्याची घोषणा केलेली तालिबान अल्पसंख्याकांना किती स्वातंत्र्य देऊ शकतात हा मोठा प्रश्न आहे.

अफगाणिस्तानचं नाव बदललं

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता अनेक वादग्रस्त निर्णय घेण्यास सुरुवात केलीय. महिलांवरील निर्बंधांसोबतच तालिबान्यांनी आता अफगाणिस्तानचं नवं नाव (Afghanistan new name) ठेवल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे हेच नाव तालिबानने 1996-2001 मधील आपल्या राजवटीतही दिलं होतं. मात्र, नंतर अमेरिकेसह नाटोच्या सैन्याने तालिबानचा पराभव करत नावात बदल केला. आता पुन्हा अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर तालिबानचा प्रमुख नेता मुल्ला अब्दुल बरादरने (Mullah Abdul Ghani Baradar) अफगाणिस्तानचं नाव अस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असं ठेवलंय

संबंधित बातम्या 

अफगाणिस्तान ताब्यात घेतला पण तालिबानकडे विदेशी चलनाचा एक छदामही नाही, IMF चा कर्ज देण्यास नकार

अफगाणिस्तान: जिथं सिकंदर थकला, औरंगजेबाचा दारुण पराभव झाला, रशिया-अमेरीकेनं पळ काढला

तालिबान्यांच्या मागे दिसणाऱ्या पेंटींगचं मराठ्यांच्या इतिहासाशी थेट कनेक्शन? वाचा सविस्तर