क्रुरतेचा कळस..! या देशात माणुसकी तरी शिल्लक राहिली का? लहान मुलांना तरी सोडा रे

| Updated on: Sep 30, 2022 | 6:34 PM

काबुलमध्ये तालिबानकडून करण्यात आलेल्या स्फोटात शाळेतील निष्पाप 100 मुलांचा अंत्य झाला आहे. अजूनही मदतकार्य सुरुच आहे.

क्रुरतेचा कळस..! या देशात माणुसकी तरी शिल्लक राहिली का? लहान मुलांना तरी सोडा रे
Follow us on

काबूलः अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील (Kabul) एका शाळेत शिक्षण केंद्रात केलेल्या स्फोटात आतापर्यंत 100 मुलांचा (100 Student) अंत्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानमधील पत्रकार बिलाल सावरी यांनी या घटनेविषयी माहिती दिली आहे.बिलाल सावरी या पत्रकारानी सांगितले की, शिक्षण केंद्राच्या शिक्षकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगण्यात आले आहे की, स्फोटात ठार झालेल्या या मुलांच्या तुटलेल्या हात-पाय गोळा करून त्यांची ओळख पटवली जात आहे. एवढेच नाही तर तालिबानकडून (Taliban) माध्यमांनाही तोंड बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्या बरोबरच तालिबानने सांगितले आहे की, रुग्णालयांनाही या हल्ल्याबाबत कोणतीही माहिती कोणीही देऊ नये असंही त्यांनी सांगितले आहे.

काबुलमध्ये झालेला हा हल्ला किती भीषण होता, हे बिलाल सावरी यांनी केलेल्या ट्विटवरु लक्षात येते. त्यांनी शिक्षण केंद्राच्या एका सदस्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगितले की, आतापर्यंत 100 मुलांचे मृतदेह मोजण्यात आले आहेत. त्यापेक्षाही जास्त मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

या हल्ल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, तो आणि त्याचा मित्र घरीच होते. ज्यावेळी त्यांना या हल्ल्याचा मोठा आवाज ऐकू आला.

त्यावेळी ते बाहेर पळत आले. त्यावेळी त्यांना जवळच असलेल्या शिक्षण केंद्रातून धूर निघत असल्याचे त्यांनी दिसून आले. त्यावेळी प्रथमदर्शनी आम्ही 9 मृतदेह आणि 15 जखमींना बाहेर काढले.

त्यानंतर वर्गातील दृश्य भयानक होते, कारण वर्गातील प्रत्येक खुर्चीवर आणि टेबलाखाली विद्यार्थ्यांचे मृतदेह पडले अडकून पडले होते.

या घटनेनंतर बचावलेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की,तालिबानने आम्हाला धमकी दिली असून या गोष्टीची कुठेही वाच्यता करायची नाही असं सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जखमींची किंवा मृतांचे व्हिडीओही बनवू नका असंही त्यांनी सांगितले.

काबुलच्या पोलीस प्रमुखांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की, शुक्रवारी सकाळी दश्ती बर्ची भागातील एका शाळेत हा स्फोट झाला आहे.

अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक शिया समुदायाचे बहुतांश लोक या भागात राहतात. या हल्ल्यात हायस्कूलचे विद्यार्थ्यांचे मृतदेहही सामील आहेत.

या केंद्राचे नाव काज हायर एज्युकेशनल सेंटर असून या केंद्रातून महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेसाठीची तयारी करुन घेतली जाते.

या हल्ल्याची अजून कोणीही जबाबदारी स्वीकारली नसून दश्ती बर्ची परिसरातील हजारा समुदायाच्या लोकांना नेहमीच तालिबानकडून लक्ष्य केले जात असल्याचे बोलले जात आहे.