Afghanistan Mosque Blast : ‘एक बटन दाबलं आणि स्वत: सोबतच 50 लोकांचे चिथडे’, मशिदीवरील आत्मघातकी हल्ल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर

| Updated on: Oct 19, 2021 | 6:44 PM

कुंदुजमध्ये मशिदीबाहेर झालेल्या स्फोटाचा धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे, यामध्ये आत्मघातकी दहशतवादी मशिदीबाहेर आल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे. शिवाय यातील काही लोकांच्या हातात बंदुकाही दिसत आहेत.

Afghanistan Mosque Blast : एक बटन दाबलं आणि स्वत: सोबतच 50 लोकांचे चिथडे, मशिदीवरील आत्मघातकी हल्ल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर
मशिदीवरील बॉम्बहल्ल्याचं सीसीटीव्ही फूटेज समोर
Follow us on

अफगाणिस्तानच्या कुंदुजमध्ये मशिदीबाहेर झालेल्या स्फोटाचा धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे, यामध्ये आत्मघातकी दहशतवादी मशिदीबाहेर आल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे. शिवाय यातील काही लोकांच्या हातात बंदुकाही दिसत आहेत. ISIS-K या संघटनेने हा हल्ला केल्याचा संशय आहे. या हल्ल्यात तब्बल 50 अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्लाचा हा व्हिडीओ अतिशय भयानक आहे. (Afghanistan kunduz city bomb blast target shiite mosque several people injured dozens of casualties cctv video viral)

AFP या वृत्तसंस्थेला तालिबानच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, कुंदुज शहरात (Attack on Kunduz Mosque) शुक्रवारच्या नमाजानंतर शिया मशिदीवर हल्ला करण्यात आला. साक्षीदारांनी सांगितले की, जेव्हा ते प्रार्थना करत होते, तेव्हा त्यांनी स्फोटाचा आवाज ऐकला. मात्र, कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

पाहा मशिदीवरील हल्ल्याचा धक्कादायक व्हिडीओ:

रक्ताने माखलेले अनेक मृतदेह जमिनीवर

सोशल मीडियावर शेअर केलेल्या अनेक फोटोमध्ये रक्ताने माखलेले अनेक मृतदेह जमिनीवर पडलेले दिसतात. दुसर्‍या व्हिडिओमध्ये महिला आणि मुलांला काही पुरुष घटनास्थळापासून दूर घेऊन जाताना दिसत आहेत. मात्र एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय मदत गटाचा एक कर्मचारीही जखमींमध्ये आहे. कुंदुज सेंट्रल हॉस्पिटलचे म्हणणे आहे की, 35 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. “डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स”द्वारे या स्वयंसेवी संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या आणखी एका रुग्णालयाने सांगितले की. त्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी 15 लोकांचा मृत्यू झाला आहे.

काबूलमध्येही मशिदीवर हल्ला झाला

याच घटनेच्या 5 दिवसाआधी काबूलमधील एका मशिदीच्या गेटवर जीवघेणा बॉम्ब स्फोट झाला होता. यामध्ये अनेक नागरिक मारले गेले. या हल्ल्याची जबाबदारी इसिस-के म्हणजेच इस्लामिक स्टेट-खोरासनने (ISIS-K Attacks) घेतली आहे. ही इस्लामिक स्टेट या जागतिक दहशतवादी संघटनेना आयसीसची अफगाणिस्तान शाखा आहे. तालिबानला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहित यांच्या आईचा काहिच दिवसांपूर्वी मृत्यू झाला, त्यामुळे इथं शोकसभा आयोजत करण्यात आली होती. आयसीस-केच्या दहशतवाद्यांनी याच शोकसभेला लक्ष्य केलं.

हेही वाचा:

Kabul Blast : अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये मशिदीसमोर बॉम्बस्फोट आणि गोळीबार, अनेकांचा मृत्यू

ग्राहकाची दाढी कापली, ट्रीम केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, तालिबान्यांचा सलून चालकांना फतवा