Kabul Blast : अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये मशिदीसमोर बॉम्बस्फोट आणि गोळीबार, अनेकांचा मृत्यू

तालिबानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका मशिदीबाहेर हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. या हल्ल्यात मोठ्या संख्येनं लोक मारले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

Kabul Blast : अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये मशिदीसमोर बॉम्बस्फोट आणि गोळीबार, अनेकांचा मृत्यू
बॉम्ब स्फोट (फाईल फोटो)


नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये रविवारी भीषण बॉम्बस्फोट झालाय. या बॉम्बस्फोटात अनेक नागरिकांचा मृत्यू झालाय. हा बॉम्बस्फोट एका मशिदीच्या गेटवर झालाय. या स्फोटाची माहिती तालिबानच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. दरम्यान, हल्लाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाही. पण हा हल्ला आयएसआय-के (ISIS-K Attacks) म्हणजे इस्लामिक स्टेट-खुरासान या दहशतवादी संघटनेनं घडवून आणला आहे. ही दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटची अफगाणिस्तान शाखा आहे. आयएसआय ही तालिबानची कट्टर विरोधक मानली जाते. आयएसआयकडून तालिबानविरोधात सातत्यानं कारवाया सुरु आहेत. (Bomb blast in front of a mosque in Kabul, Afghanistan)

मिळालेल्या माहितीनुसार तालिबानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका मशिदीबाहेर हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. या हल्ल्यात मोठ्या संख्येनं लोक मारले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. हा बॉम्ब स्फोट काबुलच्या ईदगाह मशिदीच्या गेटसमोर झाला. या हल्ल्यात नेमके किती लोक मारले गेले याची माहिती तालिबान सरकारकडून देण्यात आली नाही.

बॉम्बस्फोटानंतर गोळीबार

जबीउल्लाह मुजाहिद हा तालिबान सरकारमध्ये सूचना आणि संस्कृती मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत. त्याने दिलेल्या माहितीनुसार हा बॉम्ब स्फोट रविवारी दुपारी गर्दीच्या ठिकाणी घडवून आणला. दुपारी अचानक मशिदीच्या बाहेर अचानक बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी परिसरात मोठी गर्दी होती. त्यामुळे या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर शेकडो लोक जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार या बॉम्बस्फोटानंतर मशिदीच्या परिसरात गोळीबारही झाला.

तालिबान निशाण्यावर

अजून एका रिपोर्टनुसार मागील आठवड्यात एका मुजाहिदाच्या आईचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर रविवारी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक मशिदीत गोळा झाले होते. त्याचवेळी हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. याचा अर्थ हा की हल्लेखोराच्या निशाण्यावर ताबिलान होतं. एएफपी न्यूज एजन्सीच्या पत्रकारांच्या मतानुसार राजधानीत दोन ठिकाणी बॉम्बस्फोट आणि गोळीबाराचा आवाज ऐकायला मिळाला. घटनास्थळी रुग्णावाहिका दाखल झाली त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं.

अमेरिकेचा ड्रोन हल्ला, अल-कायदाच्या टॉप लीडरचा खात्मा

सीरियामध्ये ड्रोन हल्ल्यात अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा कमांडर ठार झाला आहे. अमेरिकन चॅनेल फॉक्स न्यूजने अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. 20 सप्टेंबर रोजी सलीम अबू-अहमद अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मारला गेला. हा हल्ला इदलिब शहरावर करण्यात आला. सलीम अल-कायदाला फंडींग करायचा शिवाय, विविध दहशतवादी हल्ल्यांना मंजुरी देण्याचा अधिकारही त्याच्याकडे होता.

नक्की कसा मारले गेला टॉप लीडर?

अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले, ” या हवाई हल्ल्यात कुठल्याही सीरियाच्या नागरिकांचं नुकसान झालं नाही.” अमेरिकेने याआधीही इदलिब शहरात अनेक हल्ले केले आहेत, ज्यात त्यांनी अल कायदाच्या दहशतवाद्यांचा लक्ष्य केलं. सीरियात होत असलेल्या हल्ल्यांना घाबरुन आयएसआयएसचा प्रमुख अबू अल बकर बगदादी पूर्व सीरियामधून इडलिबला पळून आला आणि अजूनही तो याच शहरात लपला आहे. अमेरिकेकडून होणारे हे ड्रोन हल्ले कधी दहशतवाद्यांच्या ट्रकवर केले जातात तर कधी त्यांच्या कारवर.

इतर बातम्या :

सुपरस्टार शाहरुखचा मुलगा आर्यन खान अखेर अटकेत, इतर 8 जणांवरही कारवाई, आता पर्याय काय?

चतु:श्रृंगी मंदिरात गुरुवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; मंदिर प्रशासन सज्ज, ऑनलाईन दर्शनाची सुविधा

Bomb blast in front of a mosque in Kabul, Afghanistan

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI