
भारताने रविवारी इंटीग्रेटेड एअर डिफेंस वेपन सिस्टिमची (IADWS) पहिली यशस्वी चाचणी केली. IADWS ने वेगवेगळ्या उंचीवरील आणि अंतरावरील 3 वेगवेगळे टार्गेट्स उद्धवस्त केले. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO ने ओदिशाच्या किनाऱ्यावर IADWS सिस्टिमची ही चाचणी केली. ही सिस्टिम पूर्णपणे स्वदेशी आहे. बहुस्तरीय सुरक्षा प्रदान करणारी आहे. IADWS सिस्टिमच्या चाचणीनंतर चीनने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कमी अंतरावरच्या डिफेन्स सिस्टिममध्ये लेजर शस्त्र खास आहे, पण अजून याची उपयुक्तता सिद्ध व्हायची आहे, असं चिनी वर्तमानपत्र ग्लोबाल टाइम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. आधीपासून निश्चित केलेल्या परिस्थितीमध्ये चाचणी आणि युद्धाच्यावेळची स्थिती यामध्ये फरक असतो, असं चीनच म्हणणं आहे.
चिनी शस्त्रांबद्दल जे जगभरात बोललं जातं, तेच ग्लोबल टाइम्स भारतीय शस्त्रांबद्दल बोलतोय. IADWS एक एअर डिफेन्स प्रणाली आहे. यात तीन अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. QRSAM (क्विक रिएक्शन सरफेस टू एअर मिसाइल), VSHORADS (वेरी शॉर्ट रेंज एअर डिफेंस सिस्टम) आणि हाय पावर लेजर आधारित डायरेक्टेड एनर्जी वेपन (DEW) यामध्ये आहे. ही तिन्ही शस्त्र सेंट्रल कमांड सेंटरद्वारे कंट्रोल केली जातात. टेस्ट दरम्यान तीन वेगवेगळ्या टार्गेट्सना एकाचवेळी लक्ष्य करण्यात आलं. यात दोन हायस्पीड ड्रोन्स आणि एक मल्टी-कॉप्टर ड्रोनचा समावेश आहे. तिन्ही टार्गेट्स QRSAM, VSHORADS आणि लेजरद्वारे हवेतच नष्ट करण्यात आले.
चिनी एक्सपर्ट्च विश्लेषण काय?
बीजिंग स्थित एअरोस्पेस नॉलेज मॅग्जीनचे चीफ एडिटर वांग यानान यांनी सोमवारी ग्लोबल टाइम्सला सांगितलं की, IADWS ला ड्रोन, क्रूज मिसाइल, हेलिकॉप्टर आणि कमी उंचीवरुन उड्डाणाऱ्या विमानांना टार्गेट करण्यासाठी बनवण्यात आलं आहे. ही सिस्टिम कमी आणि मध्यम ऊंचीच्या लक्ष्यांना टार्गेट करु शकते. याची मारक क्षमता मर्यादीत आहे.
महत्वाची डेवलपमेंट काय?
फक्त काही देशांनीच कॉम्बॅट रेडी लेजर सिस्टिम बनवण्यात यश मिळवलय असं वांग यांनी सांगितलं. IADWS मधील तीन प्रणाल्या QRSAM, VSHORADS तंत्रज्ञानाच्या दृष्टीने नवीन नाहीत. पण लेजर सिस्टिम महत्वाची डेवलपमेंट आहे.