
‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पंबाजातील नऊ अतिरेकी प्रशिक्षण केंद्र नेस्तनाबूत केले असले तरी त्यांची खुमखूमी अजून गेलेली नाही. आता पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेने आता अफगाणिस्तानच्या सीमेजवळील खैबर पख्तूनख्वाह प्रांतात आपले नवीन ट्रेनिंग कॅम्प स्थापन करण्याचे उद्योग सुरु केले आहेत. तसेच जुन्या कॅम्पचा विस्तारही सुरु केला आहे.
पाकिस्तानी सैन्य आणि सरकारने प्रायोजित केलेल्या अतिरेकी लष्कर -ए- तैयबाने अफगाणिस्तानात सीमेपासून केवळ 47 किलोमीटर अंतरावर खैबर पख्तूनख्वाह प्रांतात लोवर डिर जिल्ह्याच्या कुम्बन मैदानी प्रदेशात जिहाद-ए अक्सा नावाचा अतिरेक्यांचे प्रशिक्षण आणि राहण्यासाठीचे नवीन सेंटर तयार करत आहे.
या नव्या ट्रेनिंग सेंटरची निर्मिती लष्कर-ए-तैयबाने ऑपरेशन सिंदूर नंतर दोन महिन्यांनी जुलैपासून सुरु केले होते. सेंटरचा पहिल्या मजल्याचा ढाचा उभारला आहे. आता त्याच्या आरसीसी छताचे काम चालू आहे. नव्या अतिरेकी सेंटरची निर्मिती लष्कर-ए-तैयबाने त्यांच्या आधीच्या नवनिर्मित मस्जिद जामिया अहले सुन्नाहच्या ठीक शेजारील रिकाम्या जमीनीवर सुरु केले आहे. त्यास सॅटेलाईट फोटोद्वारा दुजोरा मिळालेला आहे.
या ट्रेनिंग कँपमध्ये लष्कर ए तैयबाचे दोन प्रमुख ट्रेनिंग प्रोग्रॅम दौरा-ए-खास आणि दौरा-लष्कर चालवले जाणर आहेत. ट्रेनिंग सेंटरचे संचालनाची जबाबदारी अंतिरेकी संघटनेने त्यांच्या प्रमुख कमांडरपैकी एक नसर जावेद याला सोपवली आहे. नसर जावेद हा भारतात साल २००६ मध्ये हैदराबादमध्ये झालेल्या ब्लास्टचा संयुक्त मास्टरमाईंड आहे.
याशिवाय सूत्रांच्या मते अतिरेक्यांना जिहादचे ट्रेनिंग देण्याची जबाबदारी लष्कर- ए-तैयबाने मोहम्मद यासिन उर्फ बिलाल याला दिली आहे. आता अतिरेक्यांच्या प्रशिक्षणाचे सर्व काम लष्करचे कमांडर अनसुल्लाह खान याला दिले आहे.अनसुल्लाह खान याने साल २०१६ मध्ये लष्करचा गड हबीबुल्लाह ट्रेनिंग कँम्पमधून ट्रेनिंग घेतले आहे.
खैबर पख्तूनख्वाह प्रांतात निर्माण होत असलेल्या ट्रेनिंग सेंटर जिहाद-ए-अक्साची जबाबदारी ज्या नसर जावेद याच्या सोपवली आहे तो साल २००४ ते २०१५ पर्यंत लष्कर -ए-तैयबाच्या पाक व्याप्त काश्मीरातील दुलाई ट्रेंनिग कँपचे संचालन केलेले आहे. आणि सध्या तो लष्करसाठी फंड गोळा करणारी शाखा खिदमत ए खलकशी जोडलेला आहे. ही बंदी घातलेल्या फलाह ए इंसानियत फाउंडेशनचे बदललेले नाव आहे.
खैबर पख्तूनख्वाहचा लोवर डिर भाग हा गेल्या दोन दशकांपासून अतिरेक्यांचा मोठा अड्डा आहे. जेथे अतिरेकी संघटना अल बद्र आणि तहरीक ए तालिबानचे अतिरेकी प्रशिक्षण अड्डे अस्तित्वात आहेत. परंतू आता ऑपरेशन सिंदूर नंतर बदललेल्या परिस्थितीत आता अतिरेकी संघटना हिजबुल मुजाहिदीनच्या या लोवर डिरच्या मैदानी बंडाई भागात अतिरेक्यांच्या कँपच्या निर्मितीचे फोटो समोर आले आहेत. त्यानंतर लष्कर-ए-तैयबाच्या देखील निर्मिती सुरु असलेल्या अतिरेकी ट्रेनिंगचे फोटो याच लोवर डिर भागातील असल्याचे उघड झाले आहेत.