
इस्रायलसोबत सीजफायर झाल्यानंतर इराण पुन्हा एकदा आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या मागे लागला आहे. इराणने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. बारा दिवस चाललेल्या युद्धात इस्रायलने पहिल्या दिवसापासून इराणचे मोठे मोहरे टिपले. इराणच्या IRGC फोर्सच्या अनेक बड्या कमांडर्सचा खात्मा केला. भविष्यातही इस्रायलकडून अशा प्रकारची कारवाई होऊ शकते. याची इराणला भिती आहे, म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला आहे. इराण आता आपल्या काही सैन्य संघटनांच्या प्रमुखांची नियुक्ती करणार नाही. इस्रायलच्या टार्गेट किलिंगपासून वाचण्यासाठी इराणने असा निर्णय घेतला आहे. 13 जूनला युद्धाला सुरुवात झाल्यापासून इस्रायलने इराणचे 10 सैन्य कमांडर्स मारले.
इराणच्या काहयान वर्तमानपत्रानुसार, इराण सरकारने खतम अल-अनबियाच्या प्रमुखाची घोषणा केलेली नाही. वर्तमानपत्राने आपल्या बातमीत म्हटलय की, ज्याला बिग्रेडच नेतृत्व करण्याची संधी मिळाली, त्याने आपली जबाबदारी संभाळली आहे. पण इराणने उत्तराधिकाऱ्याच्या नावाची घोषणा केलेली नाही. युद्धाच्या सुरुवातीला इस्रायलने खतम-अल-अनबियाचा प्रमुख शादमानीची हत्या केली. शमदानीनंतर ज्याला कमान मिळाली, इस्रायलने त्याची सुद्धा हत्या केली.
इराणच्या या संस्थेच नेतृत्व कोणाकडे?
इराणच्या सैन्य रचनेत एक ब्रिगेड आहे. इराणची ही इंजिनिअरिंग फर्म आहे. याचं नियंत्रण इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सकडे (IRGC) आहे. ही फर्म GHORB या नावाने सुद्धा ओळखली जाते. IRGC ची प्रमुख इंजिनिअरींग शाखा आहे. औद्योगिक आणि विकास प्रकल्पात त्यांचा प्रामुख्याने सहभाग असतो.
इस्रायलच्या रडारवर हीच ब्रिगेड का होती ?
खतमच मूळ काम मिसाइल बनवणं, शस्त्रास्त्रांवर लक्ष ठेवणं आहे. युद्धात इस्रायलच्या रडारवर हीच ब्रिगेड होती. खतम अल-अनबियाला 1980-88 इराण-इराक युद्धादरम्यान देशाच्या पुनर्निर्माणात मदत करण्यासाठी बनवलं होतं. या संस्थेचा प्रमुख अली खामेनेई यांचा जवळचा माणूस मानला जातो.
हमासचा फॉर्म्युला
नियुक्ती जाहीन न करण्याच्या निर्णयावर इराणने हमासचा फॉर्म्युला आपल्याकडे लागू केला अशी चर्चा होतेय. इस्रायलच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी हमासने याह्या सिनवारच्या हत्येनंतर कुठल्याही कमांडरची नियुक्ती केली. कुठल्याही कमांडरला नियुक्त केल्यानंतर इस्रायल त्याला उडवणार असं हमासच्या अधिकाऱ्यांच मत होतं. कमांडरची नियुक्ती जाहीर केली नाही, तर इस्रायलला त्याला मारणं कठीण होईल.
इराणच्या सैन्य प्रवक्त्याने काय सांगितलं?
“आम्ही पूर्वीच्या चुकांची आता पुनरावृत्ती करणार नाही. ज्या पद्धतीने आमचे कमांडर मारले गेले, तो एक झटका होता. पण इराणचा पाया खूप मजबूत आहे” असं इराणच्या सैन्य प्रवक्त्याने मेहर न्यूज एजन्सीशी बोलताना सांगितलं.