
इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढताना दिसत आहे. इराणच्या दिशेने अमेरिकेने एक पाऊस पुढे टाकले. इराणनेही मोठी धमकी देत थेट म्हटले की, यापूर्वी दिलेला त्रास आणि आता जे सुरू आहे, त्या सर्वांना एकत्रच उत्तर दिले जाईल. कोणत्याही क्षणी अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू होऊ शकते. अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. यादरम्यान सरकारकडून आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्यात आला. याला अमेरिकेने विरोध केला असून इराणमधील लोकांचा लढा शेवटच्या टप्प्यात असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच म्हणत या आंदोलनाला पाठिंबा दिला. इराणने स्पष्ट शब्दात सांगितले की, आमच्या सुरक्षेच्या मुद्द्यात कोणी येत असेल तर हात कापले जातील. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. इराण सरकार अमेरिकेने दिलेल्या धमक्यांना थेट उत्तर देताना दिसत आहे.
इराणवर कधीही हल्ला होऊ शकतो, याचे मोठे संकेत पुढे येताना दिसत असून विमान कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयाने खळबळ उडाली आहे. युरोपमधील प्रमुख विमान कंपन्यांनी खबरदारीचे उपाय करत मोठा निर्णय घेतला आहे. डच एअरलाइन केएलएमने इस्रायल, फ्रेंच एअर फ्रान्स यांनी दुबई आणि सौदी अरेबियाला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. सुरक्षेचे कारण देत त्यांनी हा निर्णय घेतला.
यादरम्यान कंपन्यांनी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आमच्याकडे प्रथम असल्याचे सांगत हा निर्णय घेतला. यासोबतच त्यांनी सांगितले की, आमच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. जर्मनीच्या लुफ्थांसा ग्रुपने जानेवारी अखेरपर्यंत इस्रायलला जाणारी रात्रीची उड्डाणे रद्द केली, असतानाच आता हा निर्णय घेण्यात आला आहे
ज्याप्रकारे विमान कंपन्या निर्णय घेत आहेत, त्यावरून हे स्पष्ट होताना दिसत आहे की, कोणत्याही क्षणी युद्ध पेटू शकते. इराणकडून अगोदरच सांगण्यात आले की, अमेरिकेने आमच्यावर हल्ला करण्याची हिंमत केली तर आम्ही संपूर्ण जगाला नष्ट करू. इराण आणि भारताचे संबंध कायमच चांगले राहिले आहेत. मात्र, इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशावर टॅरिफ लावला जाईल, अशी धमकी अगोदरच अमेरिकेकडून देण्यात आली.