America Iran Clash : शेवटी अमेरिकेने तो निर्णय घेतलाच, तब्बल 50000 सैनिक…इराणवर महाभयंकर संकट?

अमेरिका आपल्या हवाई दलाला बळ देत आहे. जर्मनीच्या स्पँगडाहलेम एअर बेसवरून F-16 फायटर जेट मध्य पूर्वेत पाठवले जात आहे. सोबतच F-35 या अत्याधुनिक फायटर जेटलाही तैनात करण्यात येत आहे.

America Iran Clash : शेवटी अमेरिकेने तो निर्णय घेतलाच, तब्बल 50000 सैनिक...इराणवर महाभयंकर संकट?
donald trump and mojtaba khamenei
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 19, 2026 | 6:54 PM

America And Iran : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा नवा अध्याय आता सुरु झाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर नव्याने हल्ले करत आहेत. इराणने नुकतेच जॉर्डन येथील अमेरिकन लष्करी तळावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अमेरिकेचे दोन सैनिक मारले गेले. इराणच्या या हल्ल्यानंतर अमेरिकेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. अमेरिकेकडून इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. दरम्यान, आता इराणला धडकी भरवणारी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे तब्बल 50000 सैनिक अलर्ट मोड़वर आहेत. त्यामुळे भविष्यात आता काहीही होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

अमेरिकन हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान?

मध्य पूर्वेतील तणाव आता चांगलाच वाढला जात आहे. अमेरिकन सेनेने सलग आठव्या दिवशी इराणवरील आपले हल्ले चालूच ठेवले आहेत. यूएस सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून इराणी एअर डिफेन्स सिस्टीम, रडार सिस्टीम, मिसाईल तसेच ड्रोन ठेवण्याच्या ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत. अमेरिकेच्या या हल्ल्यांमध्ये इराणचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. आता अमेरिका आपल्या या कारवाया आणखी वाढवणार असल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकेने तयार ठेवले 50000 सैनिक

द जेरुसलेम पोस्टच्या स्पेशल रिपोर्टनुसार मध्य पूर्वेत असलेल्या 50000 अमेरिकन सैनिकांना हायअलर्टवर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. कोणत्याही क्षणी संघर्ष वाढू शकतो. त्यामुळे अलर्ट राहावे, असे या सैनिकांना सांगण्यात आले आहे. मध्य पूर्वेत अगोदरच अमेरिकन सैनिक वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच या भागात अतिरिक्त शस्त्र, दारुगोळा, लॉजिस्टिक सपोर्ट देण्यात आलेला आहे.

फायटर जेट रवाना

दुसरीकडे अमेरिका आपल्या हवाई दलाला बळ देत आहे. जर्मनीच्या स्पँगडाहलेम एअर बेसवरून F-16 फायटर जेट मध्य पूर्वेत पाठवले जात आहे. सोबतच F-35 या अत्याधुनिक फायटर जेटलाही तैनात करण्यात येत आहे. हे दोन्ही विमानं इस्त्रायल तसेच अन्य प्रमुख अमेरिकन लष्करी तळावर पाठवले जात आहेत. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इराण अमेरिकन सैन्याच्या हल्ल्यांना कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us