इराणचे समर्थक तुम्हाला… अमेरिकेने दिला थेट मोठा इशारा, जगात खळबळ, थेट..

इराण आणि अमेरिका युद्ध एका घातक टप्प्यात आहे. त्यामध्येच अमेरिकेकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. होर्मुज खाडीत अमेरिका आपले लष्कर उतरवण्याच्या तयारीत आहेत. इराणची तटबंदी अमेरिकेला दूर करायची आहे. होर्मुज खाडी सुरू करण्यासाठी अमेरिकेने काही तासाचा वेळही इराणला दिला होता.

इराणचे समर्थक तुम्हाला... अमेरिकेने दिला थेट मोठा इशारा, जगात खळबळ, थेट..
America
| Updated on: Mar 23, 2026 | 10:20 AM

अमेरिका आणि इराण युद्ध एका घातक टप्प्यात पोहोचले आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. तीन आठवडे या युद्धाला पूर्ण झालीत. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेने आपल्या नागरिकांना मोठा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे की, इराणचे समर्थक अमेरिकन नागरिकांवर हल्ला करू शकतात. अमेरिकेने स्पष्ट शब्दात सांगितले की, ते या युद्धातून माघार घेणार नाहीत. शिवाय होर्मुज खाडीतून मागे हटण्यासाठी अमेरिकेकडून इराणला 48 तासांचा वेळ देण्यात आला. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने लिहिले की, जगभरातील आणि विशेष म्हणजे मध्य पूर्वेत असलेल्या अमेरिकन नागरिकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. विदेशात राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांनी अमेरिकन दूतावासाने दिलेल्या सूचनेचे पालन करावे. हवाई क्षेत्र बंद असल्याने त्यांच्या प्रवासात काही समस्या निर्माण होऊ शकतात. मध्य पूर्वेत अनेक भागात अमेरिकन दूतावासाला टार्गेट करण्यात आले.

इराणचे समर्थक जगभरात अमेरिकेच्या ठिकाणांना टार्गेट करून हल्ले करत आहेत. त्यामुळे सावध राहणे गरजेचे असल्याचे अमेरिकेने आपल्या नागरिकांना म्हटले आहे. सध्याची परिस्थिती बघता या युद्धात अमेरिका मागे हटणार असे सांगितले जाते होते. मात्र, आता अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये या युद्धात अमेरिका मागे हटणार नाही.

उलट होर्मुज खाडीत आता अमेरिकेचे लष्कर उतरण्याच्या तयारीत आहे. इराणची तटबंदी नष्ट करण्याचा निर्णय अमेरिकेकडून घेण्यात आला. मोठा हल्ला करण्याच्या तयारीत अमेरिका आहे. अमेरिकेला होर्मुज खाडीवर ताबा हवा आहे. अमेरिकेने होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता इराणला 48 तासांचा वेळ दिला आहे. मात्र, इराणकडूनही मोठा इशारा अमेरिकेला देण्यात आला.

पुढील काही तासात होर्मुज खाडीत भयंकर घडामोडी घडू शकतात. अमेरिकेचे लष्कर होर्मुज खाडीत उतरले तर इराण देखील कोणताही विचार न करता नडणार हे स्पष्टच आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने या युद्धात अमेरिकेवर मोठा दबाव जगातील इतर देशांचा आहे. आखाती देशही या युद्धात मोठ्या प्रमाणात भरडले जात असल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us