
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिकेत आहेत. शेजारील छोट्याशा देशावर हल्ला करून त्यांनी तेलावर नियंत्रण मिळवले, आता अमेरिका वेनेजुएलाचे तेल जगभरात विकणार आहे. नुकताच अमेरिकेने मोठा हल्ला केला. आपल्या सैनिकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने हा घातक हल्ला केला. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली. अमेरिकेच्या लष्कराने सीरियातील इस्लामिक स्टेट अर्थात ISIS च्या ठिकाणांवर मोठा हल्ला केला. काही तास हे हवाई हल्ले सुरू होते. अमेरिकेच्या कमांडने हवाई हल्ल्याबद्दल माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानंतर हा हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, 13 डिसेंबर 2025 रोजी सीरियातील पलमायरा येथे आयएसआयएस हल्ला केला होता. त्यामध्ये अमेरिकी सैनिक ठार झाले होते. त्याचाच बदला म्हणन हा हल्ला अमेरिकेकडून करण्यात आला.
याबाबत बोलताना शनिवारी अमेरिकेने म्हटले की, आमचा मेसेज स्पष्ट आणि थेट आहे की, जर तुम्ही आमच्या सैनिकांना नुकसान पोहोचवत असाल तर जगातील कोणत्याही कोपऱ्यात लपून बसा तुम्हाला शोधू शोधू मारणार. तुम्ही कितीही वाचण्याचा प्रयत्न करा पण तसे होणार नाही. दहशतवाद रोखण्यासाठी आम्ही कोणताही विचार करणार नाहीत. अमेरिकच्या सैन्याने ISIS च्या तब्बल 70 ठिकणी हल्ला केला.
असा दावा केला जात आहे की, शनिवारी अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या कारवाईत त्यांना मोठे यश मिळाले. या हल्ल्याने ISIS चे कंबरडे मोडल्याचे सांगितले जात आहे. अनेक दहशतवादी अमेरिकेच्या या हल्ल्यात गेल्याचा दावा आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या निशाण्यावर ISIS आहे. त्यामध्येच तब्बल 70 ठिकाणी हल्ले करण्यात आली. ISIS दहशतवादी संघटनेविरोधात अमेरिका आक्रमक भूमिका घेत आहे.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने थेट वेनेजुएलावर मोठा हल्ला करत त्यांचे अध्यक्ष मादुरो यांना अटक केली. अमेरिका सतत वेनेजुएलावर हल्ले करताना दिसली. मादुरो सध्या अमेरिकेत असून त्यांना अमेरिकेतील जेलमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यावर खटला चालू आहे. वेनेजुएलावर आणि तेथील तेलावर पूर्णपणे आता अमेरिकेचे नियंत्रण आहे. अमेरिका जगभरात वेनेजुएलाचे तेल विकणार आहे.