भारत महासंकटात, जवळचा मित्र दुरावण्याचे संकेत, थेट या देशाकडून आता तेल खरेदीचे…
वेनेजुएलावर आणि त्यांच्या तेलावर सध्या पूर्णपणे अमेरिकेचे नियंत्रण आहे. नुकताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेतली आहे. वेनेजुएलाचे तेल भारत खरेदी करू शकतो, तशी इच्छा अमेरिकेची आहे. त्यामुळे मोठ्या घडामोडी घडू शकतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका मागून एक जगाला धक्का देणारे निर्णय घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेच्या लष्कराने वेनेजुएलावर मोठी कारवाई करत हल्ला केला. त्यानंतर थेट वेनेजुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली. हैराण करणारे म्हणजे लष्कराने थेट मादुरो यांना त्यांच्या बेडरूममधून अटक केली. अमेरिकेच्या या हल्ल्यात जवळपास 40 वेनेजुएला नागरिकांचा जीव गेला. आता वेनेजुएलावर अमेरिकाचा ताबा आहे. फक्त वेनेजुएला नाही तर अनेक देशांना धमक्या अमेरिकेकडून दिल्या जात आहेत. इराणमधील परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प हात धुवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, इराणच्या सरकारने मोठा इशारा दिला. इतरही काही देश अमेरिकेच्या कारवाईमुळे तणावात असल्याचे बघायला मिळतंय. भारतावर अमेरिकेचा दबाव असून रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद भारताने नाही केली तर 500 टक्के टॅरिफ लावू अशी थेट धमकी दिली.
भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद करावी, याकरिता अमेरिका आग्रही असून अगोदरच 50 टक्के टॅरिफ लावला आहे. आता भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी. याकरिता अमेरिकेने मोठा डाव टाकला आहे. ज्यामुळे जगाचे संपूर्ण गणिते बिघडू शकतात. भारताने आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले होते की, आम्ही आमच्या जनतेच्या फायद्यासाठी निर्णय घेऊ, कंपन्यांना जिथून स्वस्त कच्चे तेल मिळेल तिथून त्या खरेदी करू शकतात.
अमेरिकेने रशियाला अडकवण्यासाठी थेट वेनेजुएलाचे तेल खरेदी करण्यासाठी भारताला मोठी ऑफर दिल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका भारताला वेनेजुएलाकडून तेल खरेदी करण्यासाठी परवानगी देऊ शकतो. भारताची वाढलेली ऊर्जेची मागणी बघता अमेरिका भारताला वेनेजुएलाचे तेल खरेदी करण्याची परवानगी देऊ शकते. वेनेजुएलाच्या तेलावर सध्या पूर्णपणे अमेरिकेचे नियंत्रण आहे. अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबद्दल बोलताना म्हटले की, आम्ही सध्या त्यावर काम करत आहोत.
अधिकाऱ्याने अमेरिकेचे ऊर्जा मंत्री क्रिस्टोफर राइट यांच्या भाष्याबद्दल बोलताना म्हटले की, राइट यांनी म्हटले की, अमेरिका जवळपास सर्वच देशांना वेनेजुएलाचे तेल विकण्यासाठी तयार आहे. मात्र, रशियाला भारताला स्वस्तामध्ये तेल देतो. वेनेजुएलाच्या तेलाच्या किंमती आणि मार्केटींग अमेरिका ठरवणार आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी नुकताच तेल कंपन्यांची बैठक घेतली. यादरम्यान भारतासह अन्य देशांसोबत वेनेजुएलाच्या तेलाचे करार करण्यावर त्यांनी भाष्य केले.
