Trump : अखेर 24 तासातच ट्रम्प यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय, कुणाच्याही ध्यानीमनी नसताना थेट…

अमेरिकेतील प्रसिद्ध कंजर्व्हेटिव्ह कार्यकर्ते चार्ली कर्क यांची गोळीबारात हत्या झाल्याने देशभर खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीया असलेल्या कर्क यांच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ट्रम्प यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मारेकऱ्याला शोधून काढण्याचे आश्वासन दिले आहे. कर्क यांना मरणोत्तर राष्ट्रपती स्वातंत्र्य पदक देण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे. ही घटना अमेरिकेतील राजकीय हिंसाचाराचा धोका अधोरेखित करते.

Trump : अखेर 24 तासातच ट्रम्प यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय, कुणाच्याही ध्यानीमनी नसताना थेट…
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
Image Credit source: social media
| Updated on: Sep 12, 2025 | 9:19 AM

अमेरिकेतील कंझर्व्हटिव्ह ॲक्टिव्हिस्ट आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्ंरप यांच्या निकटवर्तीय सहकाकी असलेलेल चार्ली कर्क यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.त्यांच्या हत्येमुळे खुद्द डोनाल्ड ट्रंप हेही हादरले आहेत. या हत्याकांडामुळे संपूर्ण अमेरिकेतील नागरिकांना धक्का बसला आहे. चार्ली कर्कच्या हत्येचा व्हिडिओ जगभरात व्हायरल होत आहे, ज्यामुळे अमेरिकेतील राजकीय हिंसाचाराचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. कारण कर्कने तरुण रिपब्लिकन मतदारांना एकत्र करण्यात मोठी भूमिका बजावली होती आणि कर्क हा इस्रायलचा कट्टर समर्थक देखील होता.

याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच चार्ली कर्क यांना मरणोत्तर राष्ट्रपती स्वातंत्र्य पदक प्रदान करतील अशी घोषणा डोनाल्ड ट्रंप यांनी केल्याचे वृत्त रिपब्लिकन फ्युचर अमेरिकाने दिले आहे.

सर्च ऑपरेशन सुरू

अमेरिकेच्या ओरेम येथील यूटा वॅली यूनिवर्सिटीमध्ये बुधवारी ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. कर्क यांच्या मृत्यूमुळे ट्रम्प अतिशय दु:खी आहेत. कर्क यांचा मारेकरी पकडण्यासाठी आकाश पाताळ एक करेन अशी घोषणा त्यांनी केली. त्यासाठी डोअर-टू-डोअर सर्च ऑपरेशन सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. एवढंच नव्हे तर चार्ली कर्कच्या सन्मानार्थ रविवारपर्यंत राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल असेही ट्रम्प यांनी जाहीर केले.

मारेकऱ्याला सरकार शोधून काढेलच

चार्ली कर्क हे ट्रम्पच्या अंतर्गत वर्तुळातील एक प्रभावशाली व्यक्ती होते. ट्रम्पच्या नेटवर्कमध्ये त्यांची मोठी ओळख होती आणि ते ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या चळवळीचा महत्वाचा चेहरा बनले. 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांना तरुणांची मते मिळवून देण्यात कर्क यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ‘अमेरिकेसाठी हा अंधारमय क्षण आहे… ज्यांच्याशी तुम्ही सहमत नाही त्यांना अत्यंत घृणास्पद आणि नीच पद्धतीने लक्ष्य करण्याचे दुःखद परिणाम म्हणजे हिंसाचार आणि खून… या अमानवी कृत्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाचा माझं सरकार शोध घेईल.’ असे ट्रम्प यांनी निक्षून सांगितले.

तो व्हिडीओ व्हायरल

खरं तर, चार्ली कर्क युटा व्हॅली युनिव्हर्सिटीमध्ये एका खुल्या व्यासपीठावर सामूहिक गोळीबारांवरील प्रश्नांची उत्तरे देत होते, तेव्हाच अचानक त्यांच्या मानेवर गोळी लागली आणि ते खुर्चीवरून पडले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कर्क एका पांढऱ्या तंबूखाली मायक्रोफोन धरून बोलत होते, तेव्हा अचानक गोळी झाडली गेली आणि त्याच्या मानेतून रक्ताचे ओघळ वाहू लागले. चार्ली कर्क हे ‘द अमेरिकन कमबॅक टूर’ कार्यक्रमाचा भाग म्हणून येथे विद्यार्थ्यांना संबोधित करत होते तेव्हाच त्यांची निर्घृण हत्या झाली.

या घटनेनंतर, युनिव्हर्सिटीमध्ये ताबडतोब रिकामी करण्यात आली आणि तेथील सर्व वर्ग अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले. कर्क यांच्या हत्येमुळे संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली. चार्ली कर्कला कोणी आणि का लक्ष्य केले, असेच प्रश्न सध्या सर्वांच्या मनात असून मारेकऱ्याच्या शोधासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.