
इराणवर हल्ला करण्याची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक दिसत आहे. अमेरिका सध्याच्या परिस्थितीला सगळीकडून फसली आहे. कोणताही निघण्याची मार्ग सापडत नाही. होर्मुजमुळे मोठी नाचक्की अमेरिकेची झाली. या वाईट काळात अमेरिकेच्या अध्यक्षांनी थेट अनेक देशांना मदत मागितली. मात्र, अमेरिकेच्या मदतीला एकही देश पुढे येत नाही. आता नाटो देशांना अमेरिका धमकावताना दिसत आहे. त्यामध्येच अमेरिकेत मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उधळून टाकण्यात आला. मात्र, असा काही भयंकर कट अमेरिकेच्या विरोधात रचला जात असल्याने खळबळ उडाली. सध्याच्या घडीला अमेरिका एका बाजूने नाही तर सर्वच बाजूने कोंडीत सापडली आहे. काही महिन्यांपूर्वी ज्या रशियाकडून तेल न खरेदी करण्यासाठी अमेरिका दबाव आणत होती, त्याच रशियाकडून तेल खरेदी करा म्हणण्याची वेळ अमेरिकेवर आली. ब्राझीलसह भारतावर अमेरिकेने मोठा टॅरिफ लावला होता, कारण दोन्ही देश मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करत आहेत.
इराणसोबतच्या युद्धादरम्यान अमेरिकन नागरिक डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाराज आहेत. कारण त्यांच्या या युद्धाच्या निर्णयामुळे अमेरिकाही संकटात असून जागतिक बाजार अस्थिर झाला. तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ सतत होत आहे. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत मागूनही एक देश पण त्यांच्या मदतीसाठी पुढे आला नाही.
डोनाल्ड ट्रम्प इराणसोबत युद्ध लढत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ एकही अमेरिकन नागरिक पुढे आला नाही आणि त्यांचे समर्थन केले नाही. कोणत्याही प्रकारचे समर्थन अमेरिकेत लोक करत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्ध सुरू केले पण त्यामागे एकही ठोस कारण नाही. इराणसोबत युद्ध लढण्यास अमेरिकन लोकांची नकाराची घंटा होती.
पण जनतेच्या मताकडे दुर्लक्ष करत मोठा हल्ला इराणवर करण्यात आला आणि तिथेच डोनाल्ड ट्रम्प अडचणीत आले. अमेरिकन लोकांना आक्रमक म्हणून पाहिले जाणे आवडत नाही. राजकीय शास्त्रज्ञ ब्रूस जेंटलसन यांनी सध्याच्या परिस्थितीवर बोलताना म्हटले की, अमेरिकेतील युद्धाला पाठिंबा केवळ त्याच्या प्रगतीवरच नाही तर सार्वजनिक वृत्तीवर देखील अवलंबून असतो.