Israel Iran War : युद्ध सुरु असताना मध्यरात्री अमेरिकेत एका अधिकाऱ्याने घेतला मोठा निर्णय, डोनाल्ड ट्रम्प संतापले

Israel Iran War : सध्या सगळीकडे इस्रायल-इराण युद्धाची चर्चा आहे. या युद्धामुळे अनेक देशांना आर्थिक परिणामांना सामोर जावं लागणार आहे. अजूनपर्यंत अमेरिका या युद्धात उतरलेली नाही. या सगळ्या घडामोडींदरम्यान अमेरिकेत एका अधिकाऱ्याने मध्यरात्री मोठा निर्णय घेतला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत.

Israel Iran War : युद्ध सुरु असताना मध्यरात्री अमेरिकेत एका अधिकाऱ्याने घेतला मोठा निर्णय, डोनाल्ड ट्रम्प संतापले
| Updated on: Jun 19, 2025 | 9:18 AM

इस्रायल आणि इराण या जगातील दोन मोठया देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारात चिंतेचे ढग जमा झाले आहेत. काहीही करुन हे युद्ध थांबावं, अशीच जगाची इच्छा आहे. मध्य पूर्वेत स्फोटक स्थिती आहे. कच्चा तेलाच्या किंमतीपासून सोनं आणि डॉलरच्या किंमतीमध्ये मोठा चढ-उतार पहायला मिळत आहे. या परिस्थितीत अमेरिकी फेडरल रिझर्व्हने एक हैराण करणारा पण स्थिरतेचे संकेत देणारा निर्णय घेतला आहे. फेडने व्याजदरात कोणताही बदल न करता ते दर स्थिर ठेवण्याची घोषणा केलीय. याच निर्णयामुळे जागतिक बाजारांना थोडाबहुत दिलासा मिळू शकतो. फेडने बुधवारी आपल्या दोन दिवसीय बैठकीनंतर ही घोषणा केली. बेंचमार्क लेंडिंग रेट 4.25% स्थिर ठेवला जाईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत संभाव्य कपातीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फेडच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेला अजूनही मुद्रास्फिति आणि धीमा आर्थिक वृद्धी दर या दुहेरी आव्हानाचा सामना करावा लागतोय. समितीच असं मत आहे की, सध्याची परिस्थिती लक्षात घेता वर्तमान व्याजदर उपयुक्त राहतील. “देशात आर्थिक घडामोडी स्थिर आहेत. पण महागाईच्या आघाडीवर येणाऱ्या काळात नवीन आव्हान उभी राहू शकतात” असं फेड प्रमुख जेरोम पॉवेल म्हणाले.

बाजाराकडून निर्णयाच स्वागत

फेडच्या निर्णयाच अमेरिकी शेअर बाजाराने जोरदार स्वागत केलं. डाऊ जोन्समध्ये 100 अंकांची वाढ पहायला मिळाली. S&P 500 मध्ये 0.33% आणि NASDAQ मध्ये 0.51% उसळी पहायला मिळाली. खासकरुन टेक्नोलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली रिकव्हरी दिसली.

ट्रम्प फेडरल प्रमुखाला मूर्ख म्हणाले

फेडच्या घोषणेआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेड प्रमुख जेरोम पॉवेल यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांना ‘मूर्ख’ सुद्धा म्हटलं. पॉवेल यांना मी आवडत नाही, असं ट्रम्प यांचं म्हणणं होतं. व्याजदरात कपात व्हायला पाहिजे होती, असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. ‘मी स्वत: फेडचा प्रमुख बनू शकतो का?’ असा टोला त्यांनी लगावला.

अमेरिकी अर्थव्यवस्थेत चढ-उतार का?

FOMC च्या बैठकीनंतर पॉवेल म्हणाले की, नेट एक्सपोर्ट आणि टॅरिफ्समुळे अर्थव्यवस्थेत चढ-उतार पहायला मिळत आहेत. पण लेबर मार्केट आणि रोजगाराची स्थिती मजबूत आहे. फेडची प्राथमिकता 2% मुद्रास्फिती आणि पूर्ण रोजगार लक्ष्य आहे, यावर त्यांनी जोर दिला.