बांगलादेशात हाहाकार! चोराच्या उलट्या बोंबा, भारताकडे थेट बोट, थेट भारताला..

बांगलादेशात तणाव वाढला आहे. त्यातच आता स्थिती अधिक गंभीर बनली आहे. मंत्र्यांचे घरही सोडली जात नाहीत. या सर्वांमध्ये आपल्या देशातील तणाव नियंत्रणात आणायचा सोडून भारताला याकरिता दोषी ठरवण्याचे काम बांगलादेश करत आहे.

बांगलादेशात हाहाकार! चोराच्या उलट्या बोंबा, भारताकडे थेट बोट, थेट भारताला..
Bangladesh
| Updated on: Nov 21, 2026 | 9:06 AM

पुन्हा एकदा बांगलादेशात मोठा हिंसाचार सुरू आहे. मंत्र्यांच्या घरावर बॉम्बहल्ले केले जात आहेत. आवामी लीगकडून बांगलादेशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. हेच नाही तर बांगलादेश सरकारने थेट आवामी लीगला दहशतवादी संघटना म्हटले. आवामी लीग विरोधातील लढाईत सर्वांनी एकत्र यावे असे तारिक रहमान यांनी म्हटले. आता बांगलादेशात पुन्हा तणाव वाढला आहे. अगोदर आवामी लीग संबंधित नेत्यांच्या घरांना टार्गेट करण्यात आल्यानंतर आता थेट सरकारमधील मंत्र्यांची घरे निशाण्यावर आहेत. त्यातच कारण नसतानाही भारताविरोधात आग ओकताना तारीक रहमान दिसत आहेत. स्वत:च्या देशातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना अपयश मिळत असताना त्याचे खापर भारतावर फोडण्याचा प्रकार सुरू आहे.

तारीक रहमान यांच्या सरकारमधील विदेश राज्यमंत्री हुमायूं कबीर यांच्या सिलहट येथील घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. त्यानंतर कबीर यांनी काही तासात म्हटले की, शेख हसीना यांच्या आवामी लीगच्या कार्यकर्त्यांकडून देशभरात हिंसा घडवली जात आहे. हे सर्व दहशतवाद्यासारखे काम आहे. हेच नाही तर बांगलादेशचे पंतप्रधान तारीक रहमान यांनी भारताचे नाव न घेता यासर्वांसाठी भारतच कारणीभूत असल्याचे म्हटले.

Loading...

हुमायूं यांनी या हल्ल्यानंतर म्हटले की, आवामी लीग आता दहशतवादी संघटना बनली आहे. कुठे बॉम्ब फेकत आहेत तर कुठे आग लावत आहेत. बागंलादेशात शेख हसीना यांचा पक्षावर कारवाई करण्यात आली असून दहशतवादी संघटना त्यांच्या पक्षाला जाहीर केले. बांगलादेशचे पोलिस उपायुक्त अफजल हुसैन यांनी म्हटले की, मंत्र्यांच्य घरावर झालेल्या हल्ल्यामध्ये कोणाचा जीव गेला नाही किंवा कोणत्याही नुकसानीबद्दल माहिती नाही.

हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांची ओळख अजून पटली नाही. तारीक रहमान यांनी म्हटले होते की, सीमा पार बसलेले लोक हे सर्व घडून आणत आहेत. सर्वकाही तिकडून चालत आहे. तारीक रहमान यांच्या या आरोपांवर भारताने उत्तर देणे टाळले. शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला आहे. शेख हसीना भारतात असून बांगलादेशमध्ये लवकरच जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us