हाहा:कार ! भूकंपाचा जोरदार झटका, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारती कोसळल्या; शेकडो लोक दगावल्याची भीती

| Updated on: Feb 06, 2023 | 8:37 AM

केवळ तुर्कीच नव्हे तर इस्रायल, पॅलेस्टाईन, सायप्रस, लेबनान आणि इराकमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यापूर्वी तुर्की आणि इराणच्या सीमेवर भूकंपाचे झटके जाणवले होते.

हाहा:कार ! भूकंपाचा जोरदार झटका, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारती कोसळल्या; शेकडो लोक दगावल्याची भीती
earthquake
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अंकारा: तुर्कीत आज जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.8 एवढी होती. स्थानिक वेळेनुसार आज पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्र बिंदू जमिनीच्या आत 17.9 किलोमीटर होता. या धक्क्यामुळे तुर्कीत पत्त्याच्या बंगल्यासारख्या इमारती कोसळल्या. तर वाहनांवर इमारती आणि खांब कोसळल्याने वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या भूकंपात शेकडो लोक दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे सुद्धा वाचा

7 ते 7.9 रिक्टर स्केलचा भूकंप झाल्यावर इमारती कोसळतात. जमिनीच्या आत पाइप फूटतो. सोशल मीडियावर या संदर्भातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यातून तुर्कीत कशा पद्धतीने हाहा:कार उडाला हे पाहता येते. या व्हिडीओतून तुर्कीत भूकंपामुळे इमारती जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या नुकसानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

भीतीचं वातावरण

भूकंपानंतर तुर्कीत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. अनेक यंत्रणा भूकंपातून लोकांना सावरण्याचं काम करत आहे. भूकंपामुळे अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आहेत. वाहनांचा चक्काचूर झाला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक लोक दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

नागरिकांचा आकांत

अनेक लोक दगावल्याने अनेक लोक आकांत करतानाही दिसत आहेत. लोकांनी घरे खाली केली असून उघड्यावर येऊन थांबले आहेत. तसेच काही लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांचा शोध घेताना दिसत आहे. तर प्रशासन इमारतीचे ढिगारे दूर करण्याच्या कामाला लागलं आहे.

 

काळजात धस्स करणारे व्हिडीओ

केवळ तुर्कीच नव्हे तर इस्रायल, पॅलेस्टाईन, सायप्रस, लेबनान आणि इराकमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यापूर्वी तुर्की आणि इराणच्या सीमेवर भूकंपाचे झटके जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 एवढी नोंदवली गेली होती.

दरम्यान, आजच्या भूकंपानंतर सोशल मीडियावर भूकंपाचे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. हे व्हिडीओ काळजात धस्स करणारे आहेत. व्हिडीओत मोठमोठ्या इमारती एका क्षणात जमीनदोस्त होताना दिसत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

 

बचावकार्य सुरू

पोलीस आणि इतर यंत्रणांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं आहे. मातीचे ढिगारे बाजूला केले जात आहेत. भूकंपात किती नुकसान झाले? किती लोक दगावले? किती इमारती कोसळल्या? याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही.