Iran: पुन्हा 9/11 सारखा हल्ला? इराण डोनाल्ड ट्रम्प यांना धडा शिकवणार, ‘स्लीपर सेल’चे ते गुपित काय?

Iran Activated Sleeper Cells: इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खोमेनी यांच्या मृत्यूनंतरही इराणने नांगी टाकलेली नाही. दारूण पराभव झाला तरी अमेरिकेला, ट्रम्प यांना धडा शिकवण्याचा मोठी योजना इराणचे निम लष्कर रिव्होल्युशनरी गार्ड यांनी आखली आहे. अमेरिकेच्या हाती लागले ते सर्वात मोठे सीक्रेट

Iran: पुन्हा 9/11 सारखा हल्ला? इराण डोनाल्ड ट्रम्प यांना धडा शिकवणार, स्लीपर सेलचे ते गुपित काय?
इराण इस्त्रायल अमेरिका
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 10, 2026 | 8:49 AM

Iran Vs Israel-US War: अमेरिकेची गुप्तहेर संगघटनेच्या हाती एक एन्क्रिप्टेड रेडिओ संदेश इंटरसेप्ट लागले आहे. हा संदेश इराणकडून आल्याचे स्पष्ट झाले आहे. 28 फेब्रुवारी रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी हे अमेरिका-इस्त्रायल हल्ल्यात ठार झाले. त्याच दिवशी हा रेडिओ संदेश प्रसारित करण्यात आला. हा सामान्य संदेश नव्हता. अनेक देशातून तो प्रसारित करण्यात आला. त्यानुसार जगभरातील इराणचे स्लीपर नेटवर्क सक्रीय करण्याचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अमेरिकेत हल्ला होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

एन्क्रिप्टेड संदेश काय?

हा संदेश पूर्णपणे एन्क्रिप्टेड होता. ज्यांच्याकडे डिक्रिप्शनची चाबी होती, त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहचवण्यात आला. असे रेडिओ संदेश पाठवण्यासाठी इंटरनेट अथवा मोबाईल नेटवर्कचा उपयोग करण्यात येत नाही. असे केले तर त्याची डिजिटल ओळख स्पष्ट होते. असे संदेश प्राप्त होताच अमेरिकन आणि इस्त्रायलची यंत्रणा अलर्ट झाली आहे. हा संदेश इराणच्या निमलष्कराने स्लीपर सेलला पाठवल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे. या संदेशमध्ये नेमकं काय आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण हा स्लीपर सेलला या संदेशातून काही तरी गुप्त माहिती आणि आदेश देण्यात आल्याचा संशय बळावला आहे.

गुप्तचर यंत्रणा सक्रीय

या रेडिओ संदेशात नेमका कुठे हल्ला करण्यात येणार, कोणते ठिकाण लक्ष्य करण्यात येणार याची कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पण या रेडिओ संदेशमुळे गुप्तचर यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. हा संदेश काय आहे आणि तो कुठून पाठवण्यात आला याचा तपास करण्यात येत आहे. जागतिक रिब्रॉडकास्ट स्टेशनने याविषयीचे सतर्कतेचे संदेश गुप्तचर संघटनांना पाठवले आहे.

इराण-इस्त्रायल युद्ध थांबणार कधी?

सर्वोच्च नेता मारल्या गेल्यानंतरही इराणचे निमलष्करी दल आणि इतर संघटना या अमेरिका आणि इस्त्रायलवर हल्ले करत आहेत. दोन्ही बाजूने हल्ले वाढवण्यात आले आहे. इराणकडून अमेरिकेच्या आखातातील लष्करी तळावर हल्ले तीव्र करण्यात आले आहेत. तर लवकरच युद्ध समाप्त होईल असे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. इराणचे मोठे नुकसान झाले आहे. तर इराणमधील ऑईल डेम्पो आता अमेरिकेच्या टार्गेटवर आहेत. अर्थात अजून किती दिवस युद्ध सुरू राहिल याविषयी काहीच स्पष्ट संकेत मिळालेले नाही. युद्ध 11 दिवसांहून अधिक काळ लांबल्याने जगात भीषण इंधन आणि नैसर्गिक गॅस टंचाईची भीत वाढली आहे. या युद्धात 1,332 नागरिक मारल्या गेल्याचे समोर आले आहे.

Follow Us