Donald Trump : कुणी केला ट्रम्प यांच्यावर हल्ला?; या बास्केटबॉल पटूचे नाव का आले समोर, अमेरिकन सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

Attack On Donald Trump : शनिवारी अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळी चालविण्यात आली. त्यात ते थोडक्यात बचावले. त्यांच्या उजव्या कानाला गोळी चाटून गेली. त्यात आता सोशल मीडियावर या बास्केटबॉल खेळाडूची एंट्री झाली आहे....

Donald Trump : कुणी केला ट्रम्प यांच्यावर हल्ला?; या बास्केटबॉल पटूचे नाव का आले समोर, अमेरिकन सोशल मीडियावर मीम्सचा महापूर
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला
| Updated on: Jul 14, 2024 | 9:40 AM

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदासाठी प्रचाराला जोर शिगेला पोहचला आहे. रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प हे उमेदवार आहेत. तर जो बायडेन यांनी सत्ताधाऱ्यांची कमान सांभाळली आहे. शनिवारी प्रचारादरम्यान ट्र्म्प यांच्या सभेत गोळ्या चालविण्यात आल्या. या हल्ल्यात ट्रम्प यांच्या उजव्या कानाला वरील बाजूस गोळी चाटून गेली. या हल्ल्यानंतर अमेरिकन सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. त्यात या बास्केटबॉल खेळाडूचे नाव मिश्किलपणे घेतल्या जात आहे. कोण आहे हा खेळाडू?

ट्रम्प निशाण्यावर

पेन्सिलवेनियामधील बटलरमध्ये ट्रम्प निवडणूक रॅलीत होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्या उजव्या कानाला वरील बाजूस गोळी चाटून गेली. त्यांनी उजव्या कानवर हात ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर रक्त दिसत होते. या रॅलीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याचवेळी परिसर गोळ्यांच्या आवाजांनी भरुन गेला. सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या भोवती कडे केले. त्यावेळी एकच गडबड उडाली. लोक इकडून तिकडे पळाले. काही जण जमिनीवर झोपले. या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाली तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

या गोळीबाराच्या घटनेनंतर राष्ट्रीय बास्केटबॉल संघटनेच्या National Basketball Association (NBA) चाहत्यांनी Bronny James या खेळाडूची फिरकी घेतली. हा शूटर ब्रॉनी जेम्स असावा, अशा मीम्सचा ट्विटरवर एकच पाऊस पडला. ब्रोनी हा बॉस्केटबॉल चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. पण समर लीगमध्ये त्याला सूर गवसला नाही. चाहत्यांच्या अपेक्षांवर तो खरा उतरला नाही. त्याने जी खेळी करणे अपेक्षित होते. ती त्याच्याकडून झाली नाही. त्यामुळे त्याचे चाहते आणि बॉस्केटबॉल खेळाच्या चाहत्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली. ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यात ते बचावले. गोळी त्यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. त्याची एकच चर्चा झाली. हा शूटर नक्कीच जेम्स असावा, असा उपरोधिक टोला चाहत्यांनी लगावला. ही एक प्रकारे ट्रम्प यांच्याविषयीची नाराजी पण असल्याची चर्चा आहे.

मीम्स मधून ट्रम्प आणि जॉनवर नाराजी

ब्रॉनी जेम्स याला सामन्यात कामगिरी बजावता आली नाही. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयीची नाराजी युझर्संनी जाहीर केली. ट्रम्प सभेत उभे असताना हल्लेखोराचा निशाणा चुकलाच कसा? असा सवाल करत युझर्संनी या सर्व घडामोडींमागे वेगळंच गौडबंगाल असल्याचा एक प्रकारे दावा केला आहे. त्यांनी ब्रॉनी जेम्स याच्यावर पण आगपाखड केली. तर काहींनी अशा वाईट प्रसंगात असे ट्वीट करणाऱ्यांचा समाचार घेतला.