Sheikh Hasina Convict : मोठा निर्णय, शेख हसीना दोषी, या माणसाने पलटी मारल्यामुळे त्या अडकल्या

Sheikh Hasina Convict : बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात तेथील न्यायालयात खटला सुरु आहे. यावर निकाल आला आहे. मागच्यावर्षी त्यांना सत्तेतून बेदखल व्हावं लागलं होतं. त्या बांग्लादेशातून पळून भारतात आल्या होत्या.

Sheikh Hasina Convict : मोठा निर्णय, शेख हसीना दोषी, या माणसाने पलटी मारल्यामुळे त्या अडकल्या
Sheikh Hasina Convict
| Updated on: Nov 17, 2025 | 1:42 PM

बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात बांग्लादेशच्या इंटरनॅशनल कोर्टाचा निर्णय आला आहे. जुलै महिन्यात जो विद्रोह झाला, त्यासाठी कोर्टाने हसीना यांना दोषी मानलं आहे. त्यांना शिक्षा सुनावली आहे. हसीन यांच्यावर जुलै महिन्यात निशस्त्र नागरिकांवर गोळ्या चालवण्याचा आरोप आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर हसीना यांच्या अडचणी वाढणार आहेत. बांग्लादेशी मिडिया प्रथम आलोनुसार कोर्टाने निर्णय सुनावताना हसीना यांचा ऑडिओ सुद्धा जारी केला. बांग्लादेशात हा ऑडिओ व्हायरल झालेला. या ऑडिओमध्ये हसीनाने पोलीस प्रमुखांना गोळया चालवा असे आदेश दिले. कोर्टाने निकाल देताना मानवाधिकार आयोगाच्या रिपोर्टचा सुद्धा उल्लेख केला.

जुलै महिन्यात झालेल्या विद्रोहात ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यासाठी शेख हसीना दोषी आहे, हे कोर्टाने मान्य केलं. कोर्टाने तु पुरावे सुद्धा समोर ठेवले, जे अभियोजक पक्षाने सादर केलेले. आयसीटीने शेख हसीना यांच्याविरोधात 458 पानांचा निकाल दिला आहे. निर्णयात म्हटलय की, हसीना जानेवारी 2024 पासून हुकूमशाह बनण्याच्या दिशेने अग्रेसर होती. जानेवारी 2024 च्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षाला चिरडलं. त्यानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले, तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडायला लावल्या.

हसीना यांच्याविरोधात कोणी पलटी मारली?

जुलै महिन्यात झालेल्या विद्रोह प्रकरणात बांग्लादेश सरकारने अपदस्थ पंतप्रधान शेख हसीना, माजी गृह मंत्री असदुज्जमां खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांना आरोपी बनवलं. तिघांविरोधात इंटरनॅशनल कोर्टात खटला चालवण्यात आला. त्यावेळी अल मामून यांनी पलटी मारली. अल-मामून यांनी हसीना यांच्याविरोधात स्टेटमेंट दिलं. या दरम्यान हसीना यांचा एक ऑडिओ समोर आला. त्यात त्या पोलीस प्रमुखांशी बोलत होत्या. या कथित ऑडिओची सत्यता पटल्यानंतर हसीना यांच्याविरोधात सुनावणीला अजून वेग आला.

ट्रिब्यूनलने काय म्हटलं?

न्यायाधीश गुलाम मुर्तजा यांच्या नेतृत्वाखाली तीन न्यायाधीशांच ट्रिब्यूनल शेख हसीना यांच्याविरोधात निकाल देत आहे. जस्टिस मुर्तजा यांच्या नेतृत्वाखालील ट्रिब्यूनलमध्ये जस्टिस मोहम्मद शफीउल आलम महमूद आणि जस्टिस मोहम्मद मोहितुल हक एनाम चौधरी आहेत. आम्ही मानवाधिकार संघटना आणि अन्य संघटनांच्या अनेक रिपोर्ट्सचा विचार केला. आम्ही क्रूरतेचं विवरण सुद्धा केलं. शेख हसीना यांनी मानवतेविरोधात गुन्हे केले आहेत असं ट्रिब्यूनलने म्हटलं. मोठ्या संख्येने आंदोलकांचा मृत्यू झाला. शेख हसीना यांनी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर हेलिकॉप्टरमधून बॉम्ब वर्षाव करण्याचा आदेश दिलेला असं सुद्धा न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे.