मित्र देशाचाच भारताविरोधात खतरनाक प्लॅन, चीनशी भयंकर संगनमत, थेट चिकन नेकवरच..
भारताने वेळोवेळी बांगलादेशची मदत केली. ज्यावेळी कोणीही बांगलादेशच्या मदतीला आले नाही त्यावेळी भारताने साथ दिली. मात्र, सर्वकाही विसरून बांगलादेश भारताविरोधात मोठे पाऊल उचलत आहे. हेच नाही तर आता त्यांनी थेट चीनचे पाय धरली आहेत. भारताचीही चिंता वाढली आहे.

बांगलादेश पाकिस्ताननंतर चीनची मदत घेऊन भारताविरोधात थेट मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे बघायला मिळतंय. भारताने वेळोवेळी शेजारी मित्र म्हणून बांगलादेशची मदत केली. मात्र, सर्वकाही विसरून बांगलादेश भारताविरोधात पाऊले उचलत आहे. गंगा नदीच्या पाण्याच्या वाटपावरून भारत आणि बांगलादेश यांच्यातील दीर्घकाळ चाललेला वाद आता एका वेगळ्या ठिकाणी पोहोचला. बांगलादेशने पद्मा नदीवरील एका भव्य धरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. फक्त मंजुरीच नाही तर यादरम्यान त्यांनी थेट चीनला मदत मागितली. चीननेही बांगलादेशाला पूर्ण मदत करण्याचे आवाहन दिले. भारताची गंगा नदी जिला बांगलादेशात पद्मा नदी म्हटले जाते. बांगलादेशाच्या या निर्णयाने पुन्हा भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावात आलेत. भारताला फक्त पाण्याचीच चिंता नाही तर अजून एक मोठा धोका आहे.
1996 चा गंगा पाणी वाटप करार या वर्षी डिसेंबरमध्ये संपणार आहे. त्यापूर्वीच बांगलादेशाकडून धक्कादायक पाऊले उचलली जात आहेत. बांगलादेश कायमच त्यांच्या पाण्याच्या संकटाला भारताला जबाबदार धरतो. बांगलादेशचे तारिक रहमान सरकारने तीस्ता नदी प्रबंधन आणि पूर्णवसन याकरिता चीनची मदत मागितली. ज्याने भारताच्या सुरक्षा आणि भूराजनीतिकला धोका निर्माण झाला.
कारण भारताचा चिकन नेक यापासून अत्यंत जवळ आहे. बांगलादेशचे विदेश मंत्री डॉ. खलीलुर रहमान यांनी बिजिंगच्या दाैऱ्यावर जात चीनचे विदेश मंत्री वांग यांची भेट घेतली. यादरम्यान बांगलादेशने चीनला मदत मागितली. चीनने या प्रस्तावाचे स्वागत केले आणि बांगलादेशला पूर्ण समर्थन आणि मदत करण्याचे आश्वासन दिले. तीस्ता नदी सिक्किम आणि पश्चिम बंगालहून बांगलादेशात प्रवेश करते.
पश्चिम बंगालमध्ये भारताचे चिकन नेक 20-22 किलोमीटर लांब आणि 60 किलोमीटर दूर भूभाग आहे. हा कॉरिडोर भारताच्या मुख्य आठ राज्यांना जोडतो. याच्या जवळपास महत्वाचे हायवे, रेल्वे लाईन आणि ऊर्जा पाईपालाईन जातात. सुरक्षा एजन्सींना भीती आहे की, चीन हा बांगलादेशला मदत करण्याच्या बहाण्याने येथे धरण वगैरे तयार करू शकतो. तिथे आपली ताकद वाढू शकतो. चीन भारताच्या चिकन नेकवर लक्षही ठेऊ शकतो.