भारत इनोव्हेट्स 2026 : डीप-टेकसाठी पॅरिसमध्ये जागतिक गुंतवणूकदार रोड-शो

शिक्षण मंत्रालयाने पॅरिसमध्ये ‘भारत इनोव्हेट्स 2026’ रोड-शो आयोजित केला. भारताच्या डीप-टेक स्टार्टअप्स आणि नवोन्मेषी इकोसिस्टमला जागतिक गुंतवणूकदार, कॉर्पोरेट्स आणि संशोधन संस्थांशी जोडणे हा याचा मुख्य उद्देश आहे. 14-16 जून 2026 रोजी फ्रान्समध्ये होणाऱ्या या कार्यक्रमापूर्वी, संभाव्य भागीदारांना गुंतवणुकीच्या संधींची माहिती देण्यासाठी हा रोड-शो महत्त्वाचा ठरला. १३ अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांवर यात लक्ष केंद्रित केले जाईल.

भारत इनोव्हेट्स 2026 : डीप-टेकसाठी पॅरिसमध्ये जागतिक गुंतवणूकदार रोड-शो
Bharat Innovates 2026
| Updated on: May 06, 2026 | 2:30 PM

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने आज पॅरिस येथे ‘भारत इनोव्हेट्स 2026’ प्रदर्शित करण्यासाठी रोड-शो आयोजित केला. जागतिक गुंतवणूकदारांपर्यंत पोहोच वाढवण्याचा हा एक प्रयत्न होता. 14 ते 16 जूनदरम्यान फ्रान्समधील नीस शहरात ‘भारत इनोव्हेट्स’ हा कार्यक्रम होणार आहे. भारतातील डीप-टेक स्टार्टअप्स आणि उच्च शिक्षणातील नवोन्मेष इकोसिस्टिमना जगभरातील गुंतवणूकदार, कॉर्पोरेट्स, विद्यापीठे आणि संशोधन संस्थांशी जोडणं हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

मुख्य कार्यक्रमापूर्वी पॅरिसमध्ये जो रोड-शो आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय, पॅरिसमधील भारतीय दूतावास, भारतीय उद्योग परिसंघ (CII) आणि विविध भागधारकांचे 50 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात फ्रान्समधील व्यवसाय आणि ‘ला फ्रेंच टेक’ आणि ‘विवाटेक’ सारख्या इकोसिस्टीम , तसेच फ्रान्समधील प्रमुख शैक्षणिक संस्थांचा समावेश होता. या कार्यक्रमात ESCP बिझनेस स्कूल, ESSEC फ्रान्स, INRIA, इकोल नॉर्माल सुपेरिअर, एजन्स फ्रांसेज द डेव्हलपमेंट, इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स आणि इतर उद्योग, सल्लागार, कायदेशीर, स्टार्टअप नेटवर्कचे वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले होते.

संभाव्य गुंतवणूकदार आणि भागीदारांना ‘भारत इनोव्हेट्स 2026’ चे कार्यक्षेत्र, उद्दिष्टे आणि त्यातील गुंतवणुकीच्या संधींबाबत माहिती देण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणं हा या रोड-शोचा उद्देश होता. यावेळी शिक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री के. एम. प्रफुल्लचंद्र शर्मा सभेला संबोधित केलं. भारत-फ्रान्स जागतिक धोरणात्मक भागीदारीच्या संदर्भात ‘भारत इनोव्हेट्स 2026’ चे महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं.

 

शिक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री गोविंद जायसवाल यांनी ‘भारत इनोव्हेट्स 2026’ बद्दल प्रेझेंटेशन केलं.  फ्रेंच तसेच जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या नवोन्मेष इकोसिस्टीमशी जोडण्याच्या संधींचं सविस्तर वर्णनही त्यांनी यावेळी केलं.

या रोड-शोदरम्यान ‘भारत इनोव्हेट्स’ चा भर 13 अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांवर असल्याचे अधोरेखित करण्यात आलं. यात ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग, सेमीकंडक्टर्स, पुढील पिढीचे संचार माध्यम, ॲडव्हान्स्ड मटेरिअल आणि महत्त्वपूर्ण खनिजे, बायोटेक्नोलॉजी, अवकाश आणि संरक्षण, उत्पादन व इंडस्ट्री 4.0 यांचा समावेश आहे. नवोन्मेषक, शैक्षणिक संस्था, गुंतवणूकदार आणि उद्योग यांच्यातील दुवा मजबूत करणे हा याचा उद्देश आहे.

‘भारत इनोव्हेट्स 2026’ च्या गुंतवणूकदार-केंद्रित संरचनेचाही आढावा घेण्यात आला, ज्यामध्ये निवडक वन-टू-वन मॅचमेकिंग सत्रे, क्षेत्रनिहाय चर्चा आणि स्टार्टअप प्रदर्शनांद्वारे जागतिक गुंतवणूकदारांना उच्च-मूल्य आणि वेळेची बचत करणाऱ्या संधी उपलब्ध होतील, हे प्रामुख्याने नमूद करण्यात आलं.

परस्परसंवादी प्रश्नोत्तर सत्राने या रोड-शोचा समारोप झाला. यामध्ये ज्या व्यक्ती सहभागी झाल्या, त्यांना भारतीय प्रतिनिधीमंडळाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.

भारताचे पंतप्रधान यांनी 17 फेब्रुवारी 2026 रोजी फ्रान्सचे राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष’ उद्घाटनावेळी ‘भारत इनोव्हेट्स’ उपक्रमाची घोषणा केली होती. ‘भारत इनोव्हेट्स 2026’ ची संकल्पना भारतीय शिक्षण परिसंस्थेसाठी ‘वैश्विक संवर्धक’ म्हणून करण्यात आली आहे, जी भारतातील विद्यापीठ-नेतृत्वाखालील नवोन्मेष प्रयोगशाळेतून बाजारपेठेत आणि भारतातून जगभर पोहोचवेल. हा कार्यक्रम 14 ते 16 जून 2026 दरम्यान नीस (फ्रान्स) येथील ‘पॅलेस डेस एक्सपोजिशन’ येथे आयोजित केला जाईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us