ना विष प्रयोग ना फाशी, आता इमरान खान यांना या छोट्याशा आजाराने मारण्याचा प्लॅन, पाकिस्तानमधून खळबळजनक माहिती समोर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे गेले काही वर्ष जेलमध्येच आहेत, जेलमध्ये पाकिस्तानी सरकार आणि सैन्याकडून त्यांचा प्रचंड छळ सुरू आहे, या संदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

ना विष प्रयोग ना फाशी, आता इमरान खान यांना या छोट्याशा आजाराने मारण्याचा प्लॅन, पाकिस्तानमधून खळबळजनक माहिती समोर
इमरान खान
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 17, 2025 | 4:14 PM

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान गेल्या काही वर्षांपासून जेलमध्ये आहेत. दरम्यान आता पाकिस्तानी सरकार आणि सैन्य इमरान खान यांच्याविरोधात एक मोठा कट रचत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. इमरान खान यांचा मुलगा कासिम यांनी केलेल्या दाव्यानुसार इमरान खान यांना आता कावीळ सारख्या आजाराने मारण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यामुळेच माझ्या वडिलांना आता आडियाला जेलच्या डेथ सेलमध्ये पाठवण्यात आल्याचा दावाही कासिम यांनी केला आहे. तर दुसरीकडे इमरान खान यांना कोणीच भेटू शकत नाही, असं पाकिस्तान सरकारने सांगितलं आहे, त्यामुळे आता संशय अधिक बळावला आहे. एका वृत्तवाहिनीला माहिती देताना कासिम यांनी सांगितलं की माझ्या वडिलांना जिथे ठेवण्यात आलं आहे, त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले इतर कैदी हे कावीळासारख्या आजाराने मरत आहेत, माझ्या वडिलांना दिवसाचे 23 तास हे आडियाला जेलच्या डेथ सेलमध्ये ठेवण्यात येत आहे, तसेच कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला त्यांना भेटू दिलं जात नाही, असं कासिम यांनी म्हटलं आहे.

जेलमध्ये खराब पाणी

पुढे बोलताना कासिम यांनी असं देखील म्हटलं आहे की, माझ्या वडिलांना जिथे ठेवण्यात आलं आहे, तिथे खूपच अस्वच्छता आहे. प्रचंड घाण आणि दुर्गंधी आहे. माझ्या वडिलांना फरशीवर झोपावं लागत आहे. त्यांना पिण्यासाठी देखील अत्यंत अस्वच्छ पाणी दिलं जात आहे, जेलमध्ये इमरान खान यांचा प्रचंड छळ सुरू आहे. इमरान खान यांचा जेवढा छळ करणं शक्य आहे, तेवढा छळ सध्या जेल प्रशासनाकडून सुरू असल्याचा दावा इमरान खान यांचा मुलानं केलं आहे. दरम्यान दुसरीकडे इमरान खान यांचा पक्ष असलेल्या पीटीआयकडून देखील असेच आरोप होत आहेत, सरकारचा असा प्रयत्न आहे की, इमरान खान यांना जेलमध्ये एखाद्या आजाराची लागण व्हावी आणि त्यातच त्यांचा मृत्यू व्हावा, त्यामुळे या सरकारवर हत्येचा आरोप येणार नाही, असा आरोप पीटीआयच्या वतीनं करण्यात आला आहे.

आता मला नाही वाटतं की कधी मी माझ्या वडिलांची भेट घेऊ शकेल, मी या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये वडिलांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मला त्यांना भेटू दिलं गेलं नाही. इमरान खानचा मुलगा आपल्या भावासोबत आता पुन्हा पाकिस्तानला परतला आहे. सध्या पाकिस्तान सरकार इमरान खान यांच्या कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीला इमरान खान यांची भेट घेऊ देत नाहीये.