हिटलरच्या सोन्याने खच्चून भरलेल्या ट्रेनबाबत मोठी अपडेट, या ठिकाणी युद्धपातळीवर खोदकाम, कुणाच्या हाती लागणार खजाना?

पोलंडमधील तज्ज्ञांना एक मोठे यश मिळाले आहे. यामुळे प्रसिद्ध नाझी ट्रेन सापडण्याची शक्यता आहे. या ट्रेनमध्ये 250 दशलक्ष पौंड किमतीचा खजिना असल्याचे बोलले जात आहे.

हिटलरच्या सोन्याने खच्चून भरलेल्या ट्रेनबाबत मोठी अपडेट, या ठिकाणी युद्धपातळीवर खोदकाम, कुणाच्या हाती लागणार खजाना?
Hittler and gold
| Updated on: Aug 03, 2025 | 7:28 PM

पोलंडमधील तज्ज्ञांना एक मोठे यश मिळाले आहे. यामुळे प्रसिद्ध नाझी ट्रेन सापडण्याची शक्यता आहे. या ट्रेनमध्ये 250 दशलक्ष पौंड किमतीचा खजिना असल्याचे बोलले जात आहे. या खजिन्याच्या शोधासाठी पोलंडमधील झिमियानी येथे उत्खनन सुरू झाले आहे. या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बंकर असण्याची शक्यता आहे. या बंकरमध्ये दुर्मिळ गाड्या आणि मौल्यवान खजिना असू शकतात. पोमेरेनियन व्होइव्होडशिपचे स्मारक संरक्षक मार्सिन टायमिन्स्की यांनी या ठिकाणी भांडार असण्याची शक्यता वर्तवली आहे.

अनेक संशोधक जर्मनीचा शासक हिटलरच्या प्रसिद्ध सोन्याने भरलेल्या ट्रेनचा शोध घेत आहेत. 1945 पासून सरकार, पोलिश सैन्य आणि संशोधक या ट्रेनच्या शोधात आहेत. मात्र आता हा खजिना उत्तर पोलंडमध्ये असण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नवीन शोधमोहिमेस परवानगी दिली आहे.

कोट्यवधींचं सोनं सापडण्याची शक्यता

पोमेरेनियन व्होइवोडशिपच्या स्मारक संरक्षकाचे प्रवक्ते मार्सिन टायमिन्स्की यांनी म्हटले की, डिझियमिनीमध्ये जर्मन खजिना सापडण्याची शक्यता आहे, तसेच यात एक रूमदेखील असू शकते यात मोठ्या प्रमाणात सोनं आणि इतर मौल्यवान गोष्टी सापडण्याची शक्यता आहे. जान डेलिंगोव्स्की खजिन्याचा शोध घेणाऱ्या पथकाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या मते, 1943 मध्ये डिझियमिनीमध्ये एक सैन्य प्रशिक्षण केंद्र बांधले होते.

डेलिंगोव्स्की हे गेल्या एका दशकापासून काशुबिया प्रदेशातील गायब झालेल्या प्रसिद्ध ट्रेनचा शोध घेत आहेत. ते सध्या शोध घेत असलेल्या जागेचा नाझी अधिकारी एरिक कोच यांच्याशी संबंध आहे. एरिक कोच 1928 ते 1945 पर्यंत पूर्व प्रशियामध्ये नाझींचा गौलेटर होता. या महायुद्धानंतर, कोचवर पोलंडमध्ये खटला चालवला गेला होता.

एरिक कोचने दिली होती महत्वाची माहिती

एका अहवालानुसार एरिक कोचला भेटलेल्या एका कैद्याने म्हटले होते की, कोचने मृत्यूपूर्वी खजिन्याचे ठिकाण सांगितले होते. कैद्याच्या विधानाचा हवाला देऊन, डेलिंगोव्स्की म्हणाले की सैनिक जेर्स्क आणि क्लुचो दरम्यानच्या रस्त्यावरून भटकले होते. त्यांच्याकडे असलेला खजिना एसएस बॅरेकच्या जागेवर असलेल्या तलावाजवळील टेकडीवरील बंकरमध्ये लपवला होता. या भागात पूर्वी झालेल्या संशोधनात एक टाकी सापडली होती. त्यानंतर आता भागात मोठी शोधमोहीम राबवली जात आहे.