Santosh Deshmukh Murder : धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. दोन महिन्यांत ही मागणी पूर्ण न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा जरांगे यांनी दिला. घातपाताच्या आरोपांवरूनही मुंडे आणि जरांगे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. मुंडेंच्या एसआयटी स्थापनेवरील भूमिकेवर जरांगे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. दोन महिन्यांत मुंडेंना सहआरोपी न केल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. या प्रकरणावरून मुंडे आणि जरांगे यांच्यात शाब्दिक चकमकही झाली आहे. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात एसआयटीकडून चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी एसआयटी कधी स्थापन झाली, असा सवाल विचारत मुंडेंच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. नागपूर अधिवेशनादरम्यान धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाही उपस्थित होत्या. ही बैठक मतदारसंघातील विकासकामांसाठी असल्याचे मुंडेंनी सांगितले असले, तरी पोलीस महासंचालकांची उपस्थिती संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांनी फडणवीस आणि पवार यांनाही पापात सहभागी होऊ नका असे सुनावले आहे.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?

