Epstein Files : पोरगी चांगली आहे ना?…, एपस्टाईन फाईल्समधून आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

एपस्टाईन फाईल्स संदर्भातील काही कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामध्ये अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं देखील नाव समोर आलं आहे, या फाईल्समधून आता मोठा खुलासा समोर आला आहे.

Epstein Files : पोरगी चांगली आहे ना?...,  एपस्टाईन फाईल्समधून आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत
डोनाल्ड ट्रम्प
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 22, 2025 | 4:43 PM

अमेरिकन फायनान्सर तसेच लौंगिक गुन्ह्यातील आरोपी असलेल्या जेफ्री एपस्टाईन याच्यासंदर्भातील कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आल्यानं अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली आहे. एपस्टाईन फाईल्स सार्वजनिक होताच अनेकांची नावं समोर आली आहेत. अमेरिकेच्या न्यायालयीन विभागाकडून यातील काही कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आली आहेत. ज्यामध्ये हजारो कागदपत्रं आणि शकडो छायाचित्रांचा समावेश आहे. मात्र यातील काही कागदपत्रं ही काळी करण्यात आली आहेत, ज्यामध्ये पोलिसांचे जबाब आणि चौकशी अहवालाचा समावेश आहे. गेल्या शुक्रवारी जे डॉक्युमेंट्स रिलिज करण्यात आले होते, त्यातील 550 पेक्षा जास्त कागदपत्रं ही काळी करण्यात आली होती. पीडित मुलींची ओळख लपवण्यासाठी ही कागदपत्रं काळी करण्यात आली असावीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मात्र अद्यापही एपस्टाईन फाईलसंदर्भातील अनेक कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आलेली नाहीयेत, याबाबत अमेरिकेच्या डेप्टी अटॉर्नी जनरल टॉड बँच यांना विचारले असता, त्यांनी सांगितलं की, या प्रकरणातील उर्वरीत कागदपत्रं ही हळुहळु सार्वजनिक करण्यात येणार आहेत. दरम्यान या प्रकरणात अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं देखील नाव आलं आहे, त्यांचे काही फोटो देखील समोर आले आहेत.

अमेरिकन न्यायालयालयातील कागदपत्रानुसार जेफ्री एपस्टीन याने कथितरित्या डोनाल्ड ट्रम्प यांची भेट एका 14 वर्षांच्या मुलीशी घालून दिली होती. कोर्टाच्या रेकॉर्डनुसार एपस्टीन याने 1990 च्या दशकात फ्लोरिडा स्थित एका रिसॉर्टमध्ये 14 वर्षांच्या मुलीची आणि ट्रम्प यांची भेट घालून दिली होती. या भेटीमध्ये एपस्टीन याने ट्रम्प यांना कोपखिळी मारत त्या मुलीकडे इशारा करत चांगली आहे ना? असं हसत हसत म्हटलं होतं. तर एपस्टिन यांच्या प्रश्नावर ट्रम्प यांनी देखील हसत हसत सहमती दर्शवली होती.

काय आहे एपस्टाईन फाईल्स? 

जेफ्री एपस्टाईन हा अमेरिकेतील एक  प्रसिद्ध फायनान्सर होता, त्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे  गंभीर आरोप आहेत, या हायप्रोफाईल प्रकरणात अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नाव समोर आली आहेत, हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे.