
ऑपरेशन सिंदूरवेळी ब्रह्मोस मिसाइलने पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं होतं. आता जागतिक स्तरावर त्या मिसाइलची मागणी वाढली आहे. भारतातील मेड इन इंडिया सुपरसोनिक क्रूज ब्रह्मोस मिसाइल प्रत्येक देशाला हवी आहेत. मुस्लिम देश इंडोनेशियाला सुद्धा ब्रह्मोस मिसाइल हवं आहे. मिसाइल विकत घेण्यासाठी इंडोनेशिया आता भारतासोबत डील करतोय. इंडोनेशियाने ही मिसाइल विकत घेतल्यानंतर चीन चहूबाजूंनी ब्रह्मोस मिसाइलने घेरला जाईल. समजून घेऊया कसं ते. भारत आणि इंडोनेशियामध्ये ब्रह्मोस मिसाइलची एक मोठी डील होणार आहे. दोन्ही देश जवळपास 450 मिलियन अमेरिकी डॉलरच्या ब्रह्मोस मिसाइलची डील फायनल करण्याच्या जवळ आहेत. मागच्या गुरुवारी भारत-इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये या डीलबद्दल चर्चा झाली. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
ही डील प्रत्यक्षात आल्यास फिलीपींस नंतर इंडोनेशिया ब्रह्मोस मिसाइल सिस्टिम खरेदी करणारा दुसरा दक्षिण-पूर्व आशियाई देश बनणार आहे. या डील बद्दल नवी दिल्ली आणि जकार्तामध्ये सर्व चर्चा पूर्ण झाल्या आहेत. आता फक्त मॉस्कोकडून औपचारिक मंजुरी मिळणं बाकी आहे. कारण रशियाचा ब्रह्मोस जॉइंट वेंचरमध्ये 49.5 टक्के हिस्सा आहे.
अजून कोण-कोणत्या देशांना ही मिसाइल विकत घ्यायची आहेत?
फिलिपींसने वर्ष 2022 मध्ये भारताकडून ब्रह्मोस मिसाइल विकत घेतली. आता इंडोनेशिया 450 मिलियन डॉलरची डील करणार आहे. वियतनामला सुद्धा भारताकडून 700 मिलियन डॉलरची ब्रह्मोस खरेदी करायची आहेत. ही डील या वर्षाच्या अखेरीस होऊ शकते. असं झाल्यास वियतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपींसकडे हे मिसाइल असेल. भारताकडे आधीपासून ही मिसाइल्स तैनात आहेत.
भारतीय संरक्षण थिंक टँक युनायटेड सर्विस इंस्टिट्यूशन ऑफ इंडियाचे रिसर्चर गौरव कुमार यांनी भारत आणि इंडोनेशियामध्ये होणाऱ्या या डीलबद्दल म्हटलं की, हा सामान्य शस्त्रास्त्र करार नाही. भारताचा हा (दक्षिण-पूर्व आशिया) रणनीतिक क्षेत्रात प्रवेश आहे.
वेगवान आणि अत्याधुनिक सुपरसोनिक क्रूज मिसाइल
फिलीपींस सोबत भारताने 2022 साली करार केला. त्यानंतर मागच्यावर्षी डिलिवरी सुरु केली. वियतनाम सुद्धा 700 मिलियन डॉलरच्या संभाव्य करारावर चर्चा करतोय. दक्षिण पूर्व आशियामध्ये भारत एक प्रमुख शस्त्र निर्यातक म्हणून पुढे येत आहे. भारताकडून ब्रह्मोस विकत घेणारे चीन विरोधी देश आहेत. ब्रह्मोस मिसाइलने ऑपरेशन सिंदूरच्यावेळी शानदार प्रदर्शन केलं. संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवली. हे मिसाइल भारत आणि रशियाने मिळून तयार केलय. हे वेगवान आणि अत्याधुनिक सुपरसोनिक क्रूज मिसाइल आहे.