AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Brahmos Missile : ज्या अस्राने पाकिस्तानचं मनोबल तोडलं, ते ब्रह्मोस मिसाइल भारत आता या देशाला विकणार

Brahmos Missile : ब्रह्मोस मिसाइलच नाव काढताच पाकिस्तानची भितीने गाळण उडते. अवघ्या चार महिन्यापूर्वी पाकिस्तानने ब्रह्मोस मिसाइलने घडवलेला विद्ध्वंस पाहिला आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी ब्रह्मोसने अनेकांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. आता ब्रह्मोस विकत घेण्यासाठी अनेक देशांची रांग लागली आहे. लवकर भारत या देशाला ब्रह्मोस मिसाइल विकणार आहे.

Brahmos  Missile : ज्या अस्राने पाकिस्तानचं मनोबल तोडलं, ते ब्रह्मोस मिसाइल भारत आता या देशाला विकणार
Brahmos Missile
| Updated on: Sep 12, 2025 | 12:51 PM
Share

ब्रह्मोस हे भारताच सर्वात अत्याधुनिक, घातक मिसाइल आहे. चार महिन्यापूर्वी ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सगळ्या जगाने ब्रह्मोस मिसाइलची ताकद पाहिली. ब्रह्मोस मिसाइलने पाकिस्तानचा आत्मविश्वासच मोडून टाकला. पाकिस्तानला हतबल केलं. भारत आपल्या ताफ्यातील हेच घातक ब्रह्मोस मिसाइल आता फिलीपींसला देणार आहे. भारत फिलीपींसला लवकरच ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाइलची तिसरी बॅच पाठवणार आहे. 2022 साली दोन्ही देशांमध्ये 375 मिलियन डॉलरचा करार झाला होता. 2024 आणि 2025 च्या सुरुवातीला पहिल्या दोन बॅच पाठवण्यात आल्या आहेत. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाइलमुळे दक्षिण चीन सागरात फिलीपींसच नौदल आणखी मजबूत होणार आहे. भारताकडून ब्रह्मोस मिसाइल विकत घेणारा फिलीपींस पहिला देश आहे.

फिलीपींसने 2022 साली भारतासोबत 375 मिलियन डॉलरचा (जवळपास 3,000 कोटी रुपया) करार केला होता. यात तीन ब्रह्मोस बॅटरी आहेत. प्रत्येक बॅटरीमध्ये 290 किलोमीटर रेंज आणि मॅक 2.8 वेग असलेली मिसाइल्स आहेत. पहिली बॅच एप्रिल 2024 आणि दुसरी बॅच एप्रिल 2025 मध्ये पोहोचवण्यात आली. ब्रह्मोस मिसाइल फिलीपींसच्या नौदलाची ताकद वाढवेल. त्यांच्या किनारपट्टीची सुरक्षा अधिक भक्कम होईल. समुद्रात फिलीपींसची दुश्मनी मुख्यत्व चीन सोबत आहे.

आम्ही वेळेवर डिलीवर करु

ब्रह्मोस एयरोस्पेसचे CEO आणि MD जयतीर्थ जोशी म्हणाले की, मिसाइल तयार आहे. आम्ही वेळेवर डिलीवर करु. हा करार भारत-फिलीपींस संबंध मजबूत बनवेल.फिलीपींसने ब्रह्मोसचा आपल्या होराइजन 3 मॉडर्नायजेशन प्रोग्राममध्ये समावेश केला आहे. अजून जास्त ब्राह्मोस विकत घेण्यात त्यांनी रस दाखवला आहे.

ब्राह्मोस मिसाइल विकत घेणारा दुसरा देश कुठला?

वियतनामचा भारतासोबत 700 मिलियन डॉलर (जवळपास 5,990 कोटी रुपये) ब्रह्मोस करार अंतिम टप्यात आहे. दक्षिण चीन सागरात यामुळे वियतनामच नौदल अजून सक्षम होईल वियतनाम ब्रह्मोस मिसाइल विकत घेणारा दुसरा आशियाई देश आहे. एप्रिल 2025 मध्ये या चर्चेने गती पकडली. लवकरच या करारावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.

तिसरा ग्राहक कोण?

ऑपरेशन सिंदूरच्यावेळी ब्रह्मोस मिसाइलच्या यशाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. इंडोनेशिया 450 मिलियन डॉलर (जवळपा, 3,800 कोटी रुपये) करार करण्यासाठी तयार आहे. फिलीपींस, वियतनामनंतर इंडोनेशिया तिसरा ग्राहक असेल.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.