Britain Elections : ब्रिटनमध्ये ‘या’ नेत्याने करुन दाखवलं 400 पार, ऋषी सुनकची हालत खराब

Britain Elections : ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. ब्रिटनमध्ये आता सत्ता बदल अटळ आहे. भारतीय वशांच्या ऋषी सुनक यांच्या कंजर्वेटिव पार्टीला मोठा धक्का बसला आहे. कीर स्टार्मर यांचा पक्ष 400 पारच्या पुढे गेला आहे.

Britain Elections : ब्रिटनमध्ये या नेत्याने करुन दाखवलं 400 पार, ऋषी सुनकची हालत खराब
keir starmer-rishi sunak
| Updated on: Jul 05, 2024 | 11:21 AM

ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकीच चित्र स्पष्ट झालय. लेबर पार्टीचे कीर स्टार्मर ब्रिटनचे नवीन पंतप्रधान असतील. ऋषी सुनक यांच्या कंजर्वेटिव पार्टीपेक्षा ते खूप पुढे आहेत. विजयासाठी आवश्यक असलेल्या बहुमताच्या आकड्यापेक्षा ते खूप पुढे निघून गेले आहेत. ओपिनियन आणि एग्जिट पोल दोन्ही ठिकाणी लेबर पार्टीच्या ऐतिहासिक विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, जो योग्य ठरलाय. ऋषि सुनक यांच्या कंजर्वेटिव पार्टीच 14 वर्षांचा शासन काळ समाप्त झाला आहे. ब्रिटनमध्ये लेबर पार्टीला ऐतिहासिक विजय मिळवून देणारे कीर स्टार्मर कोण आहेत?

2 सप्टेंबर 1962 रोजी ब्रिटनमध्ये कीर स्टार्मर यांचा जन्म झाला. लेबर पार्टीनुसार त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य गरजवंतांना न्याय मिळवून देण्यासाठी खर्ची घातलं. ब्रिटीश संसदेत ते वर्ष 2020 पासून विरोधी पक्षाचे आणि लेबर पार्टीचे नेते आहेत. 2015 ते 2024 पर्यंत होलबोर्न आणि सेंट पॅनक्रास येथून खासदार झाले.

विश्वविद्यालयात जाणारे कुटुंबातील पहिले सदस्य

पूर्व इंग्लंडच्या सरी येथे ऑक्सटेड नावाच्या एका छोट्या शहरात ते लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील एका कारखान्यात काम करायचे. आई रुग्णालयात नर्स होती. स्टार्मर यांच्या आईला एक दुर्मिळ आजार होता. त्यामुळे बालपणी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान स्टार्मर यांनी 1985 साली लीड्स विश्वविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली. विश्वविद्यालयात जाणारे स्टार्मर हे कुटुंबातील पहिले सदस्य होते.

85 वर्षातील सर्वात मोठा पराभव

स्टार्मर 2015 साली पहिल्यांदा ब्रिटिश संसदेत निवडून गेले. एक वर्ष ते ब्रिटनच्या शॅडो कॅबिनेटमध्ये आव्रजन मंत्री होते. 2016 ते 2020 दरम्यान युरोपियन संघातून बाहेर पडण्यासाठी स्टार्मर शॅडो राज्य सचिवही होते. एप्रिल 2020 मध्ये स्टार्मर यांची लेबर पार्टीच्या अध्यक्षपदी निवड झाली. बरोबर त्यानंतर त्यांच्या पक्षाला 85 वर्षातील सर्वात मोठ्या पराभवाला सामोर जाव लागलं.

स्टार्मर यांची आश्वासन काय?

पहिल्यांदा घर खरेद करणाऱ्यांना प्रोत्साहन देणं हे स्टार्मर यांचं लक्ष्य आहे. 15 लाख नवीन घर बनवण्यासाठी नियोजन कायद्यात सुधारणेच त्यांनी आश्वासन दिलं आहे. शिक्षण हे सुद्धा त्यांची प्राथमिकता आहे. स्टार्मर यांनी 6,500 शिक्षकांची भरती करण्याच आश्वासन दिलं आहे.