कराची : पाकिस्तानच्या (Pakistan) संसदेत खासदारांमध्ये हाणामारी होण्याच्या घटना आश्चर्यकारक नाहीत. असाच एक प्रकार सोमवारी इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) आणि सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) च्या आमदारांमध्ये बाचाबाची झाली. पण पीपीपीच्या एका आमदाराने पीटीआयच्या महिला आमदार (woman MLA) दुआ भुट्टोची ओढनी हिसकावून घेतल्याने या भांडणाला रूद्र वळण मिळाले. ही घटना सिंध राज्याच्या विधानसभेत (Sindh Assembly) घडली. या घटनेवर आक्षेप घेत, पीटीआय नेत्या राबिया अझफर निजामी यांनी सिंध विधानसभेच्या उपसभापती रेहाना लेघारी यांना पीटीआय आमदाराच्या कृत्याबद्दल माफी मागायला सांगितले. या घटनेवर आपण कोणतीही कारवाई न केल्याने महिला खासदारांची निराशा झाली असल्याचेही त्यांनी उपसभापती लेघारी यांना सांगितले.
Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) lawmaker Rabia Azfar Nizami on Wednesday requested a public apology from the male lawmaker who allegedly snatched PTI MPA Dua Bhutto’s dupatta during the Sindh Assembly session two days ago. #etribune #news #PTI #sindhassembly pic.twitter.com/KxIcdlzLT9
— The Express Tribune (@etribune) June 22, 2022
राबिया उपसभापतींना म्हणाल्या, ‘आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान वाटायचा, पण आता तुमच्याबद्दल असणारा आदर कमी झाला. या संसदेत एका महिलेची ओढणी ओढण्यात आली होती. आम्ही तुमच्याकडे आलो… आज सातवा दिवस आहे. तुमचा अहवाल येण्याची आम्ही वाट पाहत होतोय. आम्ही यापेक्षा जास्त मागितले नाही आम्ही. तर कोणत्याही समितीची गरज नसल्याचेही म्हटलं होतं. चौकशीची गरज नाही. तुम्ही फक्त पीपीपी आमदाराला सांगा की त्यांनी विधानसभेत उभे राहून माफी मागावी. पण तुम्ही ते ही नाही केले.
त्या पुढे म्हणाल्या, ‘तुम्ही तुमची वचनबद्धता पूर्ण केली नाही. मला याबाबत कोणाशीही तक्रार नाही. पण तुम्ही स्वतः एक स्त्री आहात. तर ज्या खुर्चीवर तुम्ही बसला आहात त्यामुळे आम्हा महिलांची मान उंचावली होती. पण आता तुटला. यावर उपसभापतींनी राबियाला अजूनही उशीर झालेला नाही आणि तिने निराश होऊ नये, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, ‘माझ्याकडे अहवाल आला आणि त्यानंतर दोषींवर कारवाई झाली नाही तर तुमची निराशा होईल. असे म्हणू नका. अहवाल येणे बाकी आहे.
उपसभापतींच्या बोलण्यावर पीटीआयचे आमदार अजिबात समाधानी झाले नाहीत आणि त्यांनी आपला मुद्दा पुढे चालू ठेवला की, चौकशी झाली की नाही, आपल्याला पर्वा नाही, विधानसभेत आपली प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन दिवसांपूर्वी सिंध विधानसभेला संबोधित करताना, दुआ भुट्टो, जे विरोधी पक्षनेते हलीम आदिल शेख यांच्या पत्नी देखील आहेत, त्यांनी एका दिवसापूर्वी पीपीपीच्या आमदारावर विनयभंग केल्याचा आरोप केला. तसेच त्या म्हणाल्या की, ‘माझा दुपट्टा ओढला, जे आपल्या आई किंवा बहिणींचा आदर करत नाहीत तेच हे करू शकतात.