Explainer : तेल संकटामुळे सगळं जग टेन्शनमध्ये पण चीनला मानलं, जी तयारी केलीय त्याला तोड नाही, एकदा वाचा

Explainer : मध्य पूर्वेत इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध सुरु आहे. त्यामुळे जगातील अनेक देश तेल संकटाच्या सावटाखाली आहेत. पण चीन एकदम बिनधास्त आहे, त्यांना अजिबात फिकिर नाहीय. त्यामागे काही कारणं आहेत. चीनने जी तयारी केलीय, त्यांना खरच मानावं लागेल.

Explainer : तेल संकटामुळे सगळं जग टेन्शनमध्ये पण चीनला मानलं, जी तयारी केलीय त्याला तोड नाही, एकदा वाचा
China Oil
| Updated on: Mar 24, 2026 | 4:17 PM

अमेरिका-इस्रायलचं इराण विरोधात सुरु असलेलं युद्ध आणि स्ट्रेट ऑफ हॉमुर्झमध्ये इराणची नाकेबंदी यामुळे जागतिक तेल बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. स्ट्रेट ऑफ हॉमुर्झ जल वाहतुकीचा एक महत्वाचा मार्ग आहे. जगातील 20 टक्के तेलाची वाहतूक या मार्गावरुन होते. इथे वाहतूक बाधित झाली, तर तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम होतील अशी जगातील अनेक देशांना भिती आहे. त्यामुळे अनेक देश चिंतेत आहेत. भारताने सुद्धा कूटनितीचा मार्ग अवलंबला. इराणशी चर्चा केल्यानंतर त्यांनी भारताची काही जहाजं सोडली. सगळे देश टेन्शनमध्ये असले तरी चीन मात्र बिनधास्त आहे. एक्सपर्ट्सच्या मते चीन अशा संकटाचा सामना करण्याची खूप आधीपासून तयारी करत आहे. जागतिक तेल पुरवठ्यात काही अडथळे आल्यास आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून चीनने खूप आधीच तयारी करुन ठेवली होती. यात तेल साठवणूक भंडार बनवणं, ऊर्जा पुरवठ्याच्या स्त्रोतांच विविधीकरण, दीर्घकालीन ऊर्जा करार आणि जागतिक गुंतवणूकीसारखी पावलं चीनने आधीच उचलली होती. चीनच्या इंधनाच्या ज्या गरजा आहेत, त्यातला मोठा...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us