
चीनने 1951 मध्ये तिबेट आपल्या ताब्यात घेतलं आणि तेव्हापासून दलाई लामा यांच्यासोबत असलेलं वैर कायम आहे. तेव्हा चीनने शांततापूर्ण मुक्तता असं वर्णन केलं होतं. त्यानंतर 1959 मध्ये चिनी राटवटीविरुद्ध उठाव केला. मात्र त्यात अपयश आल्यानंतर दलाई लामा उत्तर भारतातील धर्मशाळा येथे आले. त्यांनी तिबेटी संसद आणि निर्वासित सरकार स्थापन केलं. पण याला चीनने मान्यता दिली नाही. तसेच 13व्या शतकापासून चीन हा तिबेटचा भाग असल्याचं सांगितलं. अशी पार्श्वभूमी असताना दलाई लामा यांना इतर देशांच्या प्रतिनिधींनी भेटणं काही चीनला कधीच रुचलं नाही. त्यांनी कायम त्याला विरोध केला. असेच संबंध आता चेक रिपब्लिकचे देशासोबत तोडले आहे. त्याला कारण ठरलं ते दलाई लामा आणि चेक रिपब्लिक अध्यक्ष पावेल यांची भेट.. गेल्या महिन्यात पावेल आणि दलाई लामा यांची लडाखमध्ये भेट झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी चीनने चेक रिपब्लिकेचे अध्यक्ष पेत्र पावेल यांच्याशी संबंध तोडले.
चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी एका वक्तव्यात स्पष्ट सांगितलं की, ‘चीनने वारंवार विरोध आणि कठोर भूमिका व्यक्त केल्यानंतरही पावेल यांनी दलाई लामा यांची भेट घेतली. पावलने 27 जुलैला भारताच्या हद्दीतील लडाख परिसरात जो भाग चीनच्या सीमेलगत आहे, तिथे तिबेटच्या वादग्रस्त व्यक्तीची भेट घेतली.’ लीन यांनी पुढे सांगितलं की, हे चेक सरकारने चीन सरकारला दिलेल्या राजकीय वचनबद्धतेचे गंभीर उल्लंघन आहे आणि चीनच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला हानी पोहोचवते.”
चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी स्पष्ट केलं की, “चीन याचा तीव्र निषेध करतो आणि त्याचा तीव्र विरोध करतो. मंत्रालयाने पावेलच्या या कृतीचे वर्णन प्रक्षोभक कृती म्हणून केले आहे आणि चेक राष्ट्राध्यक्षांशी सर्व संबंध संपवण्याचा निर्णय घेतला आहे.” दुसरीकडे, या भेटीनंतर चेक रिपब्लिकने स्पष्टीकरण दिलं होतं. चेकचे अध्यक्ष पेत्र पावेल यांच्या कार्यालयाने सांगितले की ही भेट दलाई लामा यांच्या निमंत्रणावरून झाली होती, जे त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करत होते. त्यांच्या कार्यालयातील कोणीही पावेलसोबत नव्हते.