AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्याशी पंगा घेणार नाही, पहिल्या दोन मिनिटातच…! पुतिनसोबतच्या मुलाखती आधीच ट्रम्प बरळले

ट्रम्प यांच्या टॅरिफ नितीमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढवळून निघाली आहे. अनेक देशांनी अमेरिकेच्या या धोरणांचा धसका घेतला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांची भेट होणार आहे. तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

माझ्याशी पंगा घेणार नाही, पहिल्या दोन मिनिटातच...! पुतिनसोबतच्या मुलाखती आधीच ट्रम्प बरळले
माझ्याशी पंगा घेणार नाही, पहिल्या दोन मिनिटातच...! पुतिनसोबतच्या मुलाखती आधीच ट्रम्प बरळलेImage Credit source: PTI
| Updated on: Aug 12, 2025 | 4:38 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही महिन्यांपासून हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचं दिसत आहे. त्यांच्या टॅरिफ धोरणामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून येत आहे. भारतावरही डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफ लावला. एकीकडे मैत्रिपूर्ण संबंध दाखवायचे आणि दुसरीकडे अडचणीत आणण्याचे धोरण अवलंबले आहे. भारताच्या 100 रुपयाच्या वस्तूची किंमत अमेरिकेत 150 रुपये होणार आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर थेट परिणाम होणार आहे. असं असताना रशिया आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शुक्रवारी भेटणार आहेत. भारतावर टॅरिफ लादल्याने आधीच रशियाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या भेटीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. पण या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बरळले आहेत. त्यामुळे या बैठकीत काय होईल याचा अंदाज आधीच बांधला जात आहे. ट्रम्प यांनी दोन्ही देशात व्यापाराची शक्यता वर्तवली आहे. तसेच स्पष्ट केलं की , पहिल्या दोन मिनिटातच काही करार होईल की नाही ते स्पष्ट होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत पहिलाच खुलासा केला आहे.

अमेरिका आणि रशियात व्यापार करार होऊ शकतो का? या प्रश्नावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, हो मला वाटते. रशियाकडे मौल्यवान जमीन आहे. जर व्लादीमीर पुतीन युद्धाऐवजी व्यापाराकडे वळले तर… पण माझ्या एका मित्राने सांगितलं की हे कठीण आहे. कारण ते फक्त लढत राहतात.’ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे सांगितलं की, ‘आम्ही व्लादिमीर पुतिनसोबत एक बैठक करणार आहोत. त्या बैठकीच्या शेवटी, कदाचित सुरुवातीच्या दोन मिनिटातच मला कळून जाईल की करार होऊ शकतो की नाही.’ रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान होणारी बैठक महत्त्वाची आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, ‘मी युद्ध विराम पाहू इच्छित आहे. मी दोन्ही बाजूंसाठी सर्वोत्तम शक्य तो करार पाहायचा आहे.’

ट्रम्प यांनी सांगितलं की, ‘पुढची बैठक जेलेंस्की आणि पुतिन, किंवा जेलेंस्की-पुतिन आणि माझ्या होईल. गरज पडली तर मी तिथे उपस्थित असेन. पण दोन्ही नेत्यांमध्ये एक बैठक निश्चित करू इच्छित आहे.’ दुसरीकडे, ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, अनेक देशांवर लादलेल्या टॅरिफ शुल्कामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. ट्रम्प म्हणाले की, ‘मला वाटते की, रशियाने आपला देश पुन्हा उभारायला हवा. तो एक मोठा देश आहे. रशियाकडे चांगले काम करण्याची भरपूर क्षमता आहे. ते चांगलं काम करत नाहीत. त्यांची अर्थव्यवस्था डगमगली आहे.’

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.