AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत, रशिया आणि चीन मोडणार अमेरिकेचं टॅरिफ स्वप्न? जर तसं झालं तर….

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प बसल्यानंतर त्यांनी चक्रावून टाकणाऱ्या घोषणाचा धडाका लावला आहे. त्याचे परिणाम आता जगभरातील देशांवर होत आहेत. असं असताना भारत, रशिया आणि चीन एकत्र येत अमेरिकेच्या धोरणांना खिळ घालू शकतात. कसं काय ते समजून घ्या

भारत, रशिया आणि चीन मोडणार अमेरिकेचं टॅरिफ स्वप्न? जर तसं झालं तर....
भारत, रशिया आणि चीन मोडणार अमेरिकेचं टॅरिफ स्वप्न? जर तसं झालं तर....Image Credit source: PTI
| Updated on: Aug 08, 2025 | 4:19 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठेपणामुळे जागतिक पातळीवर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. टॅरिफ लादल्यामुळे इतर देशांच्या निर्यात आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. अमेरिकेने भारतीय उत्पादनावर सुरुवातीला 25 टक्के टॅरिफ लावला. त्यानंतर त्यात वाढ करत आणखी 25 टक्के वाढवले. त्यामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये खळबळ उडाली आहे. कारण अमेरिकेत भारताची 100 रुपयांची वस्तू आता 150 रुपयांना विकली जाणार आहे. त्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी आपोआप कमी होईल. त्याचा फटका निर्यातदारांना बसणार आहे. अमेरिकेने भारतावर हा टॅरिफ पोटदुखीतून लावला आहे. भारत रशियाकडून तेल आणि हत्यारं विकते घेते. ही बाब अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना खटकली आहे. त्यामुळे त्यांनी भारतावर हा अतिरिक्त कर लादला आहे. दुसरीकडे, भारतानेही शेतकरी, दूध उत्पादक उद्योगांच्या हितासाठी तडजोड करणार नाही हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भारताचा पवित्रा पाहता भारत, रशिया आणि चीन हे देश एका व्यासपीठावर येऊ शकतात. त्यामुळे जागतिक व्यवस्था आणि अमेरिकेवर थेट परिणाम होऊ शकतो.

आरआयसी म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास

रशिया-भारत आणि चीन (आरआयसी) या त्रिपक्षीय देशांची एकजूट बांधण्याची सुरुवात 1990 च्या दशकात सुरु झाली होती. रशियाचे माजी पंतप्रधान येवगेनी प्रिमाकोव यांनी यासाठी प्रयत्न केले होते. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांना आव्हान देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं होतं. या व्यासपीठाच्या माध्यमातून व्यवसायिक रणनिती, आर्थिक आणि सुरक्षासंदर्भात मोट घट्ट बांधण्याची होती. 2002 पासून 2020 पर्यंत या तीन देशात 20हून अधिक मंत्रिस्तरीय बैठका झाल्या. पण 2020 नंतर भारत चीन सीमा वाद आणि करोना महामारीमुळे तिन्ही देशातील चर्चा बंद झाली. पण रशिया आणि चीन हे व्यासपीठ पुन्हा सक्रिय करण्याच्या तयारीत आहेत. भारतानेही याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

भारत, रशिया आणि चीन हे जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहेत. या तीन देशांकडे जागतिक पातळीवर समीकरणं बदलण्याची ताकद आहे. त्यामुळे हे तीन देश एकत्र आले तर अमेरिकेचं महत्त्व कमी होऊ शकतं. तसेच आशियाई देशांची ताकद संपूर्ण जगाला कळून येईल. त्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. या माध्यमातून भारताने अमेरिकेला काय तो स्पष्ट संदेश दिला आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी ब्रिक्स, भारत-रशिया भागीदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.