भारत चीन सीमेवर मोठ्या घडामोडी, चीनचा थेट निर्णय, जिनपिंग यांच्या भारत भेटीनंतर..
भारत आणि चीन यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. मात्र, चीनचे अध्यक्ष शी.जिनपिंग भारत दाैऱ्यावर आले. भारत आणि चीन यांच्यातील संबंध पुन्हा एकदा सुधारताना दिसत आहेत. त्यातच आता मोठी माहिती पुढे आली.

ब्रिक्स परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष शी.जिनपिंग भारत दाैऱ्यावर आले. तब्बल 7 वर्षानंतर जिनपिंग भारतात आले. गलवान येथील संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातील संबंध तणावात होते. गेल्या काही दिवसांचा तणाव विसरून भारत आणि चीनने नव्या मैत्रीच्या अध्यायाला सुरूवात केली. जिनपिंग यांच्या भारत भेटीनंतर भारत-चीन सीमेबाबत मोठी बातमी बातमी पुढे येतंय. चीन गेल्या काही दिवसांपासून भारताच्या सीमेवर सैन्य वाढवताना दिसले. एलएसीच्या सर्व सेक्टरमध्ये भारतीय सैन्याची मजबूत पकड आहे. ब्रिक्समध्ये चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी नुकतीच भेट दिल्यानंतर भारतीय संरक्षण मंत्रालयाने एक महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध केलाय. 2025 मध्ये उत्तर सीमांवर चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थात PLAने सैन्य घटवल्याचं या अहवालातून सांगण्यात आलंय.
2025-26 या वर्षाच्या अहवालातून संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मात्र, भारताने LAC च्या सर्व सेक्टरमध्ये आपली सैन्य तैनाती मजबूत ठेवली असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय. सध्या उत्तर सीमांवर आणि पारंपरिक प्रशिक्षण क्षेत्रांमध्ये सुमारे 10 कंबाइंड आर्म्स ब्रिगेडच्या बरोबरीचे सैन्यबळ तैनात आहे.
भारत आणि चीनदरम्यान सकारात्मक राजकीय, राजनैतिक आणि लष्करी स्तरावरील चर्चेमुळे उत्तर सीमांवरील परिस्थितीत अधिक स्थैर्य आल्याचा या अहवालात उल्लेख दिसतोय. दोन्ही देशांदरम्यान लष्करी चर्चेच्या माध्यमातून सीमेवरील प्रश्न सोडवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.बैठकांचं वातावरण सौहार्दपूर्ण असून दोन्ही बाजूंशी संबंधित मुद्दे मांडले आणि सोडवले जात आहेत, असं संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात म्हटलंय
15 जून 2020 रोजी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यानंतर पँगाँग त्सो, गोगरा-हॉट स्प्रिंग्स आणि इतर भागात मोठ्या प्रमाणावर सैन्याची तैनाती झाली. पुढे 9 डिसेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेशातील यांग्त्से, तवांग भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाली. या दोन्ही घटनांनंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही स्तरावर बैठका झाल्या, चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर आता तणाव निवळल्याचं दिसतंय
शनिवारी ब्रिक्स परिषदेसाठी जिनपिंग भारत दौऱ्यावर आले होते, ते कालच बिजिंगला परतले. ब्रिक्स परिषदेच्या उत्कृष्ट आयोजनाबाबत जिनपिंग यांनी भारताचं आणि मोदींचं अभिनंदन केलं. तसंच चीन आणि भारताने भागीदार असायला हवे, असं मतही नोंदवलं, आता जिनपिंग परतल्यानंतर भारतीय संरक्षण मंत्रालयाचा अहवाल समोर आला असून त्यात LACवरील सैन्य घटवल्याचं स्पष्टपणे नमूद आहे.