भारतीयांना बाहेर काढा, भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादा, अमेरिकेत थेट..
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावात आहेत. त्यातच आता भारतीय लोक आणि भारतीय कंपन्या अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत. भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादण्याचा तयारीत अमेरिका दिसत आहे. मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव बघायला मिळाला. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर अनेक प्रकारचे निर्बंध लादताना अमेरिका दिसली. अमेरिकेत भारतीय कंपन्या आणि भारतीय लोकांबद्दल नाराजी वाढताना दिसत आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील खासदारांनी थेट भारतीय तीन कंपन्यांवर निर्बंध घालण्याची मागणी केली. या कंपन्यांवर आरोप केले जात आहे की, या कंपन्या अमेरिकी नागरिकांचा डेटा घेत आहेत. ही घटना अशावेळी पुढे आली, त्यावेळी H1 व्हिडीओचा मुद्दा चर्चेत आहे. अमेरिकेच्या गृह विभागाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यात खाली कमेंटमध्ये लिहिण्यात आले की, आमच्या रस्त्यावरून निघून जा मिस्टर सिंह.. तुम्हाला वाहने चालवता येत नाहीत.
अमेरिकेत बाहेरून आलेल्या नागरिकांना टार्गेट करण्यात येत आहे. रस्त्यावरील अपघातात हरजिंदर सिंग, राजविंदर कुमार, बेकझान बेशेकीव, बोजोरोव आणि जसवीर सिंह यांना सोडण्याची मागणी केली जातंय. दुसऱ्या एका पोस्टमध्ये एक दाढीवाला व्यक्ती दिसत आहे. त्यात हिरो दिसत आहे त्यात म्हटले की, सोडून जा… नाही तर परिणामांना सामोरे जात.. हा वाद वाढताना दिसत असताना अमेरिकेच्या प्रशासनाने तात्काळ या पोस्ट हटवल्या. भारतीयांना बाहेर काढा आणि भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादा अशी मागणी केली जात आहे.
यापूर्वी अमेरिकेने चार भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादली. त्यात पोर्टईज पार्टनर्स, एलएलपी, सदाशिव ओवरसीज लिमिटेड, पीपी सॉफ्टटेक प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश होता. या भारतीय कंपनीवर कारवाई करताना त्यांनी इराणसोबत व्यापार करत असल्याचा आरोप केला. आता अमेरिकेच्या निशाण्यावर आयए शेख, प्रशांत गर्ग आणि रामचंद्र रांगी या तीन भारतीय कंपन्या आहेत.
अमेरिकेतील जवळपास सर्वच टेक कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येने लोक काम करतात. हे कर्मचारी जास्त करून भारत आणि चीनचे आहेत. आता नवीन प्रस्तावानुसार, कॅटेगिरी व्हिसाचे ग्रेस पीरियड कमी करण्यात आला. अमेरिका फस्ट हे धोरण राबवले जात आहे. यासोबतच व्हिसाचे नियम अत्यंत कडक करण्यात आली आहेत.
