Horrible Act of China: पैशांसाठी चीनचे सैतानी कृत्य! कैद्यांच्या हत्या करतात आणि… मानवाधिकार आयोगाचा धक्कादायक खुलासा

| Updated on: Aug 09, 2022 | 7:01 PM

China sells human organs by killing prisoners

Horrible Act of China: पैशांसाठी चीनचे सैतानी कृत्य! कैद्यांच्या हत्या करतात आणि... मानवाधिकार आयोगाचा धक्कादायक खुलासा
Follow us on

बीजिंग : यापूर्वी चीनचा(China) क्रूर चेहरा संपूर्ण जगाने पाहिला आहे. आता मात्र, चीनचे सैतानी कृत्य समोर आले आहे. चीन आपल्याच देशातील कैद्यांच्या किडनी, यकृत आणि हृदयासारख्या अवयवांची विक्री करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे मानवाधिकार आयोगानेच(Human Rights Commissions) चीनच्या या सैतानी कृत्याचा पर्दाफाश केला आहे. चीन हा मानवी अवयवांची(human organs) तस्करी करणारा दलाल बनल्याचा आरोप केला जात आहे. चीनच्या या क्रूर कृत्याला ‘फोर्स्ड ऑर्गन हार्वेस्टिंग’ असे नाव देण्यात आले आहे.

गुप्तपणे लोकांची हत्या केली जातेय

दरवर्षी सुमारे 10,000 अवयव प्रत्यारोपण केले जात असल्याचा चीन सरकारचा दावा आहे. प्रत्यक्षात मात्र चीनमध्ये दरवर्षी सुमारे 60,000 ते 1 लाख अवयव प्रत्यारोपण केले जात असल्याचा दावा मानवाधिकार आयोगाने केला आहे. यासाठी चीनमध्ये दरवर्षी 25,000 ते 50,000 लोकांची गुप्तपणे हत्या केली जात असल्याचा आरोप केला आहे.

अवयव मिळवण्यासाठी चीनने ‘फालुन गोंग’ आणि ‘उईघर मुस्लिम’या समुदायांना केलेय टार्गेट

अवयव मिळवण्यासाठी चीनने ‘फालुन गोंग’ आणि ‘उईघर मुस्लिम’या समुदायांना टार्गेट केले आहे. या समुदायातील लोकांची मोठ्या प्रमाणात हत्या केला जात असल्याचा गंभीर आरोप मानवाधिकार आयोगाने चौकशीअंती केला आहे.

‘फालुन गोंग’ आणि ‘उईघर मुस्लिम’या समुदायांनांच का केलय टार्गेट

‘फालुन गोंग’ आणि ‘उईघर मुस्लिम’या समुदायांनांच चीनने का टार्गेट केलेय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर याचे उत्तर चीनच्या राजकारणात दडले आहे. उईघर मुसलमान आणि फालुन गोंग समुदायाचे लोक चिनी साम्यवादाच्या मार्गातील मोठे अडथळे आहेत. उईघर मुस्लिम तर देशातील एक स्वतंत्र देश म्हणूनच चीनसमोर मोठा धोका आहेत, असा चिनी कम्युनिस्ट पक्षाचा दृढ विश्‍वास आहे. यातूनच लाखो उईघर मुस्लिमांना चीनने कारागृहात डांबलेले आहे.

कैंद्याच्या हत्या करुन अवयव काढले जातत

चीनमधील तुरुंगात डांबलेल्या कैंद्याच्या हत्या करुन अवयव काढले जातत. मूत्रपिंड, हृदय, यकृताची मागणी येताच तुरुंगातून उई घर मुसलमान कैद्यांना उचलून नेले जाते आणि त्यांची हत्या करुन त्यांचे अवयव काढले जात असल्याचा दावा मानवाधिकार आयोगाने केला आहे.

आम्ही जिवंत माणसाचेच अवयव देतो; चीनच्या डॉक्टरांचे संभाषण झाले रेकॉर्ड

चीनच्या या कृत्याचा पर्दाफाश करण्यासाठी मानवाधिकार आयोगाने चीनमधील तुरुंगाधिकारी व अवयव प्रत्यारोपण केंद्र तसेच अवयव खरेदी करणाऱ्यांमधील फोन कॉल टॅप केले. यात एक अधिकारी आम्ही जिवंत माणसांचेच अवयव देतो असे सांगत आहे. अशा प्रकारचे अनेक फोन रेकॉर्डिंग आणि इतर पुराव्यांच्या आधारे मानवाधिकार आयोगाने चीनचा हा सैतानी चेहरा जगासमोर आणला आहे.