
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात चीन, तुर्कस्तान आणि अझहरबैजान या देशांनी पाकची साथ दिली. त्याला शस्त्र, ड्रोन, क्षेपणास्त्र आणि संरक्षण प्रणाली पुरवली. ही सामग्री भारताविरोधात वापरण्यात आली. भारतीयांचा संताप आता समोर येत आहे. या देशांच्या कर्माची फळं त्यांना मिळाली आहे. तुर्कस्थान, चीन, अफगाणिस्तानसह मध्य-दक्षिण आशियात रात्रीपासून भूकंपाचे अजून धक्के बसले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (NSC) दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप 4.5 रिश्टर स्केलचा होता. शुक्रवारी सकाळी 6.30 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र 10 किलोमीटर खोल होते. गुरूवारी संध्याकाळी भूकंपाचे झटके जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी होती. भूंकपाचे केंद्र तुर्कीच्या एका भागात होते. राजधानी अंकारापर्यंत त्याचे धक्के जाणवले. तर आज सकाळी चीनमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले. दक्षिण-पश्चिम चीनमध्ये भूकंपाचे धक्के बसले.
अनेक देशांना बसले हादरे
गेल्या आठवड्यात जगभरातील अनेक देशांमध्ये भूकंपाचे झटके जाणवले. अफगाणिस्तान, चीन, तुर्कस्तान याशिवाय मध्य आणि दक्षिण आशियातील अनेक देशांना भूकंपाचे झटके जाणवले. अफगाणिस्तानमध्ये शुक्रवारी रात्री 1 वाजता पुन्हा भूकंप आला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4 इतकी मोजण्यात आली. सध्या तरी या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचे कोणतेही वृत्त हाती आलेले नाही. भूकंपाच्या झटक्यामुळे अनेक लोकांनी घराबाहेर धाव घेतली. एक दिवसापूर्वी भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानातील फैयझाबादच्या दक्षिणेला 82 किमी अंतरावर होते. बदख्शान भागात लोकांनी तातडीने मोकळ्या पटांगणात धाव घेतली. गेल्यावर्षी 19 एप्रिल रोजी अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर 5.8 तीव्रतेचा भूकंप आला होता. त्याचे झटके दिल्लीपर्यंत जाणवले होते.
तिबेटपर्यंत जाणवले धक्के
आज सकाळी दक्षिण-पश्चिम चीनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी होती. तर त्यापूर्वी 12 मे रोजी तिबेटच्या शिगात्से भागात 5.5 तीव्रतेचा भूकंप झाला. 7 जानेवारी 2025 रोजी तिबेटच्या टिंग्री भागात 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. भूगर्भातील हालचालींमुळे भूकंपाची मालिका एका पाठोपाठ सुरू असल्याचे दिसते. आताच काही दिवसांपूर्वी मान्यमार आणि थायलंडमध्ये भूकंपाने मोठे नुकसान केले होते.