एलएसीवर समोरासमोर चर्चा, नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यात थेट चर्चा, आजच..

भारतात ब्रिक्स परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेकडे सर्वांच्या नजरा आहेत. त्यातच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात दाखल होतील. बांगलादेशने या परिषदेकडे पाठ फिरवली. यासोबतच भारतवर काही गंभीर आरोपही केले.

एलएसीवर समोरासमोर चर्चा, नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यात थेट चर्चा, आजच..
Xi Jinping and pm modi
| Updated on: Sep 12, 2026 | 8:03 AM

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात दाखल झाले. ब्रिक्स परिषदेसाठी ते भारतात आहेत. भारत आणि रशियाचे संबंध कायमच चांगली राहिली आहेत. दोन्ही देशाचे अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. यंदा ब्रिक्स परिषदेचे आयोजन भारतात करण्यात आले. जगातील अनेक देशांचे अध्यक्ष आणि पंतप्रधान भारतात आलेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंगही भारतात दाखल होतील. रशियाचे अध्यक्ष पुतिन अगोदरच भारतात दाखल झाले. भारत आणि रशिया यांच्यात महत्वाची बैठक झाली. काही तास ही बैठक सुरू होती. काही महिन्यांपूर्वीच पुतिन भारत दाैऱ्यावर आले होते. देशांमधील व्यापार, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रकल्पांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने एका नवीन गुंतवणूक मंचाची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला.

पुतिन यांनी म्हटले की, ब्रिक्स देशांमधील आर्थिक सहकार्य वाढवणे याबाबत अन्य देशाच्या विरोधात नाही. ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी सदस्य देशांमधील उद्योग क्षेत्रातील नेत्यांच्या बैठकीला संबोधित पुतिन करतील. या परिषदेकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. पुतिन यांनी म्हटले की, आम्हाला निधीची गरज आहे. इतरही ब्रिक्स सदस्य राष्ट्रे या उपक्रमाला साथ देतील.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग शनिवारी ब्रिक्स परिषदेच्या बैठकीसाठी भारतात शनिवारी दाखल होतील. भारत आणि चीन यांच्यात व्दिपक्षीय वार्ता होईल. सीमेवरील शांती या मुद्द्यावर दोन्ही देश समोरासमोर बसून चर्चा करतील. ज्यात एलएसीवर सैन्य कमी करण्याच्या मुद्द्यावर चर्चा होईल.

चीनी विदेश मंत्रालय प्रवक्ते माओ निंग यांनी म्हटले की, इराण आणि अमेरिका संघर्ष आणि युक्रेन रशिया यांच्यातील युद्धाबाबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केली जातील. निंग यांनी म्हटले की, ब्रिक्स परिषद मिळून जगात शांती निर्माण कशी होईल, याकरिता प्रयत्न करेल. ब्रिक्स परिषदेला आज दुपारी 2.35 वाजता बंद रूमध्ये बैठक होईल. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. रात्री सर्व देशांचे प्रमुख एकत्र जेवण करतील. बांगलादेशने या परिषदेकडे पाठ फिरवली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us