AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: तुला ते जमेल तरी का?… झंझावती खेळीनंतर जगाला अभिषेकचे कौतुक, पण युवराज सिंगने मात्र केला पाणउतारा

Yuvraj Singh To Abhishek Sharma: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना भारतीय संघाने जिंकला. या सामन्यात अभिषेक शर्माने धुमाकुळ घातला, यानंतरही गुरु युवराज सिंगने शिष्य अभिषेक शर्माला ट्रोल केले.

IND vs NZ: तुला ते जमेल तरी का?... झंझावती खेळीनंतर जगाला अभिषेकचे कौतुक, पण युवराज सिंगने मात्र केला पाणउतारा
| Updated on: Oct 28, 2026 | 8:23 AM
Share

IND vs NZ 3rd T20 Match: टीम इंडियाच्या टी२० संघासाठी मंगळवारचा दिवस हा ऐतिहासिक ठरला असेल. न्यूझीलंडच्या भूमीवर तिसरा टी२० सामना खेळणाऱ्या टीम इंडियाने झंझावाती खेळ पुन्हा एकदा दाखवला. भारतीय संघाने मालिकेत ३-० ची अजिंक्य आघाडी घेतली. न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १९८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या सलामीवीरांनी तुफानी खेळी करत धु धु धुतले. पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकात भारतीय संघाचे सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी दोन विश्वविक्रम केले. आधी अवघ्या ५ षटकांत १०० धावांच्या पल्ला गाठला आणि पुढच्या षटकात नाबाद धावांचा पल्ला गाठत सर्वाधिक पॉवर प्ले धावसंख्या करण्याचा विश्वविक्रमही प्रस्थापित केला. अभिषेक शर्माने ३५ चेंडूत शतक ठोकले. असे असूनही भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने अभिषेक शर्माची शाळा घेतली आहे.

युवराजने अभिषेक शर्माला केलं ट्रोल

युवराजने इंग्लंडविरूद्ध एका षटकात धमाकेदार सहा सिक्स मारले होते. त्याच सामन्यात युवराजने १२ चेंडूत ५० धावांचा विश्वविक्रमही केलेला. आज अभिषेक शर्माने दमदार खेळ केला पण तरीही तो कमीच पडला. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी युवराजपेक्षा जास्त चेंडू अभिषेकने घेतले. या मुद्द्यावरून युवराजने अभिषेकला ट्रोल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रोल केले. युवीने सोशल मीडियावर लिहिले की, “तू अजून मला मागे टाकले नाहीस. १२ चेंडूत ५० धावा तू करु शकणार आहे का?” याच ट्विटमध्ये त्याने अभिषेक आणि वैभव सूर्यवंशी दोघांच्या खेळीचे कौतुक केले आणि त्यांच्या फटकेबाजीची वाहवा केली.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात प्रथम फलंदाजी करताना किवी संघाने निर्धारित २० षटकांत ३ गडी गमावून १९८ धावा केल्या. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या टिम सेईफर्टने ६ चेंडूत २ धावा केल्या. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने त्याचा झेल घेतला. त्यानंतर फिन एलनने आक्रमक फलंदाजी करत २५ चेंडूत ५ षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या, पण तो नितीश कुमार रेड्डीच्या गोलंदाजीवर नमन धीरने त्याचा झेल घेतला आणि त्याला बाद केले. डॅरेल मिशेलने शानदार नाबाद खेळ करत सर्वाधिक ८९ धावा फटकावल्या. ग्लेन फिलिप्सने १४ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने १७ धावा केल्या. तसेच बेव्हन जेकॉबसने २३ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३९ धावांची नाबाद खेळी खेळली.

Follow Us
कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज....
Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?
नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर?
Maharashtra MLC Election Result 2026 : नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर? विधान परिषद निवडणुकीचे ताजे चित्र
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?