AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात पदवीधर निवडणुकीत मतांचे आकडे फिरले; कराळे मास्तर ठरणार गेमचेंजर? मध्यरात्री नेमकं काय घडलं ?

नागपुरात पदवीधर निवडणुकीत मतांचे आकडे फिरले आहेत. नागपुरात कराळे मास्तर गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. मध्यरात्री नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

नागपुरात पदवीधर निवडणुकीत मतांचे आकडे फिरले; कराळे मास्तर ठरणार गेमचेंजर? मध्यरात्री नेमकं काय घडलं ?
nagpur news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 28, 2026 | 8:09 AM
Share

राज्यात विधानपरिषदेतील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी सुरू आहे. ही मतमोजणी सलग दुसऱ्या दिवशी होत आहे. या मतमोजणीदरम्यान नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये मतमोजणीदरम्यान रंजक आणि वादग्रस्त घडामोडी घडताना दिसत आहे. नागपुरात भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे. दोन प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसहित नितेश कराळे यांनीही चांगले मते मिळाली आहेत. नागपुरातील  मतमोजणीदरम्यान राजकीय वातावरण तापल्याचे दिसून आले.

नागपुरातील पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीच्या दोन्ही फेरीनंतर 1 लाख 50 हजार 874 मते वैध ठरली आहेत. या नियमानुसार, 75 हजार 438 मताचा विजयाचा कोटा ठरला आहे. दोन्ही उमेदवारांना तेवढी मते पडलेली नाहीत.  पहिल्या फेरीनंतर आता दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकांचे मते मोजण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आलं. नंतर दुसरी फेरी संपत असताना सुधाकर कोहळे 4,291 मतांनी आघाडीवर आल्याचे दिसून आले.  पहिल्या फेरीच्या मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराने विजयाचा कोटा पूर्ण केला नाही. नितेश कराळे यांना पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये 24,249 मते मिळाली आहेत. दुसऱ्या पसंतीचे कोणाला किती मते मिळतात, यावर नागपुरातील उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपुरात एकूण 60 टक्के मतदान झालं होतं. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली भागात  71 टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती.  या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे हे तिघे प्रचारासाठी मैदानात उतरले होते.

भाजप आमदार अन् काँग्रेस उमेदवाराची गळाभेट 

नागपूर पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना भाजप आमदाराने काँग्रेस उमेदवाराची गळाभेट घेतली.  काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी मतमोजणी केंद्रावर पोहचल्यानंतर भाजप आमदार प्रवीण दटके यांनी त्यांना आवाज दिला आणि दोघांनी गळाभेट घेतली. यावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस अन् भाजपच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी 

नागपुरातील मानकापूर स्टेडियम मतमोजणी केंद्राच्या बाहेरील मुख्य रोडवर काही भाजपचे आणि काही काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते.  यावेळी दोन्ही बाजूने घोषणाबाजी करण्यात आली. नंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तिथून हटविले. या मतमोजणीवरून भाजप उमेदवार सुधाकर कोहळे म्हणाले, अनेक अवैध मतं आहे. ते चुकीच्या पद्धतीने अवैध ठरवण्यात आली आहे. त्या अवैध मतांची पुन्हा तपासणी व्हावी अशी मागणी केली.  विजयाचा कोटा 15438 मतांचा असून तो कोटा कोणीही पूर्ण करू शकणार नाही. तर या निवडणुकीत कराळे गुरुजी यांनी अपेक्षेपेक्षा जास्त मतं घेतली. आता मतदारसंघात चुकीच्या पद्धतीने निकाल लागल्यास कोर्टात जाणार, असा इशारा सुधाकर कोहळे यांनी दिला आहे.

अमरावतीतही मोठी घडामोड 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ मतमोजणीविषयी अपडेट हाती आली आहे. या निवडणुकीसाठी मागील 23 तासांपासून मतमोजणी सुरू आहे.  मतमोजणीच्या 19 व्या फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक 3535 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे बंडोखर उमेदवार श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. 19 व्या फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना 8348 मते मिळाली आहेत.  तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना 4786 मते मिळाली आहेत. शिवसेनेचे बंडखोर 4813 श्रीकांत देशपांडे यांना मते मिळाली आहेत.

Follow Us
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष
कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज....
Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?
नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर?
Maharashtra MLC Election Result 2026 : नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर? विधान परिषद निवडणुकीचे ताजे चित्र
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान